कोणत्याही पदार्थांमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते. अनेकजण बाजारात गेल्यावर हिरवी गार कोथिंबीर आणतात. अनेकजण त्यांच्या फ्रिजमध्ये कोथिंबीर साठवून ठेवतात परंतु, कोथिंबीर जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ लागते. वातावरणातील आद्रतेमुळे कोथिंबीरीला अनेकवेळा पाणी सुटततं आणि ती जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ती खराब होते. गरमीच्या ऋतूमधये अनेकवेळा कोथिंबीर सुकतेज्यामुळे तीचा कोणत्याही पदार्थामध्ये उपयोग करू शकत नाही. चला तर जाणून घेऊया फ्रिजमध्ये जास्त दिवस कोथिंबीर कसे साठवायचे.
कोथिंबीर तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कोथिंबीरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स आणि पोषक तत्वं असतात. कोथिंबीर खाल्ल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कोथिंबीर नियमित खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुमच्या किडनीचे आरोग्य देखील निरोगी राहाते. कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्हाला श्वासा संबंधीत समसस्या होत नाहीत. कोथिंबीर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
कोथिंबीर जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी बाजारातून हिरवी कोथिंबीर घेऊन या . त्यानंत ती कोथिंबीर चांगल्या स्वच्छ पाण्यानी घुवा. कोथिंबीर स्वच्छ घुतल्यामुळे त्यामधील वाळू आणि माती निघुन जाते. कोथिंबीरमध्ये माती आणि वाळू असल्यामुळे ती खराब होते. कोथिंबीरीमध्ये पाणी राहिल्यामुळे ती सडते त्यामुळे धुतल्यानंतर त्यामधील सर्व पाणी काढून घ्यावे. कोथिंबीर साठवण्यासाठी ती एका हवाबंद डब्ब्यामध्ये साठवा त्यासोबतच फ्रिजमधील तापमान जास्त असल्यावर कोथिंबीर खराब होऊ शकते त्यामुळे फ्रिजमधील तापमान योग्य करणे गरजेचे असते. असे केल्यामुळे कोथिंबीर जास्त दिवस चांगली राहाते.
कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तीला कापून घ्या. त्यानंतर कोथिंबीर साठवण्यासाठी ती फिजमध्ये ठेवण्यापूर्वी हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवल्यामुळे कोथिंबीर जास्त दिवस चांगली राहाते. साठवलेली कोथिंबीर वापरण्यामुळे चांगल्या स्वच्छ पाण्यानी धुवा त्यामधील धुळ माती निघून जाते.