आज 31 डिसेंबरला रात्रीच्या जेवणात बनवा हा पदार्थ, पाहुणेही करतील कौतुक

| Updated on: Dec 31, 2024 | 9:49 PM

जगभरातील लोकं नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करतात. तर काही लोकांना हा दिवस त्यांच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत घरी साजरा करायला आवडतो. जर तुम्ही देखील घरी न्यू इयर पार्टी करत असाल तर डिनरसाठी येथे दिलेल्या यादीवरून तुम्ही आयडिया घेऊ शकता. आणि मस्त नवीन वर्षाचे जंगी स्वागत करू शकता.

आज 31 डिसेंबरला रात्रीच्या जेवणात बनवा हा पदार्थ, पाहुणेही करतील कौतुक
Dinner
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी अनेकांची आठवडाभर आधीच तयारी सुरु झाली आहे. तर हे नवीन वर्ष अनेकजण कुटुंबासह मित्रांसोबत साजरा करत असतात. एकमेकांना नववर्ष सुखाचे आनंदात जाओ यासाठी एकत्र येत सेलिब्रेशन करतात. अश्यावेळी अशी काहीजण आहेत जे ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी कुठेतरी जाण्याचा बेत आखतात, तर काहीजण हे त्याच्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत घरीच नववर्ष साजरे करतात.

जर तुम्ही सुद्धा 31 डिसेंबरच्या रात्री तुमच्या घरी पार्टी आयोजित करत असाल तर या आनंदासाठी पाहुण्यांना घरच्यांना जेवणाची सर्व तयारी करावी लागते, अशा वेळी पार्टीमध्ये संगीत, नृत्य आणि खेळांच्या आनंदाबरोबरच खाण्या-पिण्याची योग्य व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात या डिशचा समावेश करू शकता, तुमच्या कडे वेळ नसेल तर तुम्ही या पदार्थाना हॉटेलमधून देखील ऑर्डर करू शकता किंवा घरी सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या पदार्थांबद्दल…..

पनीरपासून बनवलेले पदार्थ

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही जर घरीच पार्टी करत असाल आणि तुम्हाला व्हेज पदार्थ खायचे असतील तर जेवणात तुम्ही डाळ माखनी, मटर पनीर तसेच शाही पनीर ठेऊ शकतात. यासोबत तुम्ही पनीर टिक्का सुद्धा ठेऊ शकता. तुम्ही हे पदार्थ स्टार्टअप म्हणून देखील देऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही पनीर रोल सुद्धा ट्राय करू शकता. पनीर बटर मसाला,पनीर कोफ्ता,पनीर शाही भाजी,पनीर सँडविच,पनीर भुर्जी आणि पनीर मखनी तुम्ही बनवून किंवा ऑर्डर करून जेवणात समावेश करा.

साग पनीर मराठी

थंडीच्या दिवसात काही ठिकाणी साग पनीर ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. खासकरून मोहरीच्या तेलातील सागाची भाजी अप्रतिम लागते. यात तुम्ही तुमच्या आवडीचे तेल सुद्धा वापरू शकता. रात्रीच्या जेवणासाठी साग पनीर देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो, तुम्ही ही भाजी संध्याकाळी आधीच बनवू शकता, मोहरीची हिरवी पाने आणि पालक एकत्र करून साग बनवू शकता, गरमागरम मक्याची रोटीबरोबर मोहरीच्या हिरव्या पानाची भाजी म्हणजे साग भाज्यांची चव दुप्पट होते.

नॉनव्हेज

तुम्ही जेव्हा नवीन वारशाचे स्वागत करण्यासाठी काही पाहुण्यांना पार्टीसाठी बोलवता तेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणात नॉनव्हेज ठेवणार असाल तर यात चिकन बिर्याणी, चिकन कढी , मटन कढी, फिश कढी, रोस्टेड चिकन, मटन कोफ्ता, चिकन तंदूरी, मटन शामी कबाब, हैदराबादी मटन दम, मच्छी टिक्का, चिकन मलाई टिक्का, बटर चिकन आणि चिकन कोरमा यापदार्थांपैकी तुम्ही एखादी डिश बनवू शकता.

ड्रिंक्स

नवीन वर्षाचे स्वागत करतांना खाण्याच्या पदार्थांबरोबर तुम्ही हेल्दी ड्रिंक्स ठेऊ शकतात. तुम्ही घरच्या घरी मोजिटो ड्रिंक्स तयार करू शकता. यात तुम्ही पुदिन्याची ताजे पाने, लिंबाचे रस, सोडा आणि थोडीशी रम मिक्स करू शकता. जेवण जेवल्यानंतर तुम्ही हे ड्रिंक्स घेऊ शकतात. अश्याने तुमचे अन्न पचण्यास देखील मदत होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही कोडल कॉफी, आईस टी किंवा हॉट चोको कॉफीचा समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)