आपल्यापैकी अनेकांना काहीतरी हेल्दी नाश्ता करायला खूप आवडतं. आपण अनेक प्रकारचे नाश्त्याचे प्रकार बनवतो. त्यातच जर साऊथ इंडियन डिश म्हणजे इडली, मेंदूवडा, डोसा असे अनेक प्रकार आपण नाश्त्यात बनवत असतो. त्यात या प्रकारांचं वैविध्य म्हणा त्यात प्रत्येक प्रकारच्या पदार्थांची चव त्यामुळे साऊथ इंडियन नाश्ता म्हंटल कि तोंडाला पाणी सुटते. त्यातच हे पदार्थ खाण्यास स्वादिष्ट तसेच हलके आणि निरोगी आहे. विशेषत: हिवाळ्यात नाश्ता गरम, हलका आणि शरीराला ऊर्जा देणारा असावा. अशावेळी तुम्ही देखील हे हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्त्याचे काही पर्यायही ट्राय करू शकता.
इडली डोसा व्यतिरिक्त हे साऊथ इंडियन पदार्थ करा…
अक्की रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
तांदळाचे पीठ – २ कप
उकडलेला बटाटा – १
हिरवी मिरची – २ ते ३ (बारीक चिरलेली )
आले – १ तुकडा ( किसलेले )
कांदा – २ (बारीक चिरलेला )
कोथिंबिरीची पाने – आवश्यकतेनुसार
(बारीक चिरलेली )
कढीपत्ता- आवश्यकतेनुसार
जीरा – १ टीस्पून
हळद – १/४ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – आवश्यकतेनुसार
सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, हळद पावडर व तीळ घालावे. आता उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून तांदळाच्या पिठात घालावे. यात हिरवी मिरची, आले, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे. मिश्रणात हळूहळू कोमट पाणी घालून पीठ चांगले मऊ मळून घ्या.छान मळून झाल्यावर या पिठाचे गोल गोळे बनवा. आता हे गोळे जास्त जाड व जास्त पातळ न लाटून घेता व्यवस्थित पुरीच्या आकारात लाटून घ्या. गॅसवर तवा तापवत ठेऊन द्या. त्यानंतर तापलेल्या तव्याला तेल लावून तयार केलेल्या छोट्या पुऱ्या दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. तयार झालेली अक्की रोटी कढीपत्ता, नारळाची चटणी किंवा दही सोबत सर्व्ह करा.
साहित्य:
चावल – २ कप
मूग डाळ – १ कप
काजू – ७ ते ८
काली मिर्च – १/२ टीस्पून
आले – १ तुकडा (किसलेले)
घी- २ टेबलस्पून
कढीपत्ता- आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
सर्वप्रथम तांदूळ व मूगडाळ चांगली धुवून रक्त पातेल्यात शिजवून घ्या. आता एका कढईत तूप गरम करा. त्यात काजू, काळी मिरी, आले आणि कढीपत्ता घालून परतून घ्या. डाळ आणि तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात ग्राम तुपात तयार केलेली फोडणीचा तडका द्या. त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून ५ मिनिटे शिजवावे. गरमागरम पोंगल सर्व्ह करा.
साहित्य:-
उडीद डाळ – १ वाटी (रात्रभर भिजवून ठेवलेली )
हिरवी मिरची – २ ते ३
आले – १ इंच
जीरा – १ टीस्पून
कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
सर्वप्रथम रात्रभर भिजत ठेवलेली उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. आता उडीद डाळ बारीक वाटलेल्या मिश्रणात हिरवी मिरची, आले, जिरे, कढीपत्ता व मीठ घालावे. त्यानंतर या मिश्रणापासून लहान गोल आकाराचे वडा बनवा. कढईत तेल गरम करून वडा सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. वडा तुम्ही सांभर आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
अशा रीतीने तुम्ही सुद्धा झटकेपट हेल्दी आणि चविष्ट नाश्ता बनवून घरातील सदस्यांना खायला द्या. तसेच लहान मुलांना शाळेत डब्यात देखील हे पदार्थ देऊ शकता.