मुंबई | 31 जुलै 2023 : लोक विचारतात नारायण मूर्ती इतके सडपातळ कसे ? लग्नानंतर तर अधिकच बारीक झालेत..कसं मॅनेज करता ? मी त्यांना सांगते, ‘हम फूड ऐसा बनता है की वो खा नही सकते, असे मिश्कीलपणे ‘इन्फोसिस’ या देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, टेल्कोच्या इंजिनियर, प्रसिद्ध लेखिका, 72 वर्षीय सूधा मूर्ती सांगतात. त्यांनी एका मुलाखती त्यांच्या म्हैसूर-हुबळी येथील प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
मी खूप फूडी आहे. लहानपणी मला बाहेरच्या जबाबदाऱ्या जास्त पडल्याने मला जेवण बनवायला शिकता आले नाहीत. तरी मी म्हैसूर हुडी चांगलं करते, चहा चांगला बनवते. नारायण मूर्तीं गोड खात नाहीत, त्यांना म्हैसूर पद्धतीची वांग्याची भाजी आवडते. परोटा, डाल, सब्जी, सांभार आणि भात असं बेसिक जेवण करायला मला येते, त्यामुळे कोणी नसलं तरी मला उपवास घडत नाही. तुंगभद्रा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान राहणारे दडपे पोह्यांपासून फोडणीचे-बिना फोडणीचे पोहे असे सोळा प्रकारचे पोहे बनविण्यात हुबळीकर एक्स्पर्ट असल्याचे सूधा मूर्ती म्हणतात.
मी अत्यंत शुद्ध शाकाहारी आहे, अंडं काय लसूणही खात नाही. मी जेवायला जाताना शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जाते. मला बाहेर शाकाहारी आणि मासांहारी जेवणासाठी एकच चमचा तर वापरला जात नाही ना ? असा संशय येत असतो. त्यामुळे मी खास माहीतीच्या ठिकाणी जेवते. इतकेच काय परदेशात जातानाही मी सोबत 25 ते 26 चपात्या नेते. पोहे, सूजीसारखे गरम पाणी टाकल्यानंतर तयार होतील असे रेडी टू इट पदार्थ सोबत नेते. प्रवासात छोटा कूकर सोबतच ठेवते. माझी आजी जेव्हा प्रवासात सोबत जेवण न्यायची तेव्हा मी तिला हसायचे पण आता मी तिचंच अनुकरण करते असेही सूधा मूर्ती यांनी प्रांजळपणे सांगितले.
मला कोणता एक स्पेशल पदार्थ आवडतो हे सांगणे कठीण आहे. भारत हा अनेक देश वसलेला खंडप्राय देश आहे. येथे दर 150 किलोमीटर पदार्थांची चव आणि भाषा आणि पेहराव बदलत असतो. कर्नाटकात हुबळी, म्हैसूर, बंगळुरु, चिकमंगळुर, हासन आदी दहा चवी बदलतात. गुजरातचा ढोकळा, राजस्थानची जिलेबी, पुण्याचं श्रीखंड, चितळेची बाकरवडी, कोलकाताची प्रसिद्ध मिठाई संदेश, त्रिपूराचा पायनापल, कश्मीरचा दमआलू असे विविध पदार्थ मला जाम आवडतात असे त्यांनी सांगितले. कुणाल विजयकर यांनी ‘खाने मैं क्या है ?’ या मालिकेत सूधा मूर्ती यांची खास मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी खाद्यसंस्कृतीची माहीती दिली.