kitchen hacks: बेसन पीठामधील कीटकांमुळे त्रस्त आहात? या सोप्या किचन ट्रिक्स करा फॉलो…

| Updated on: Dec 21, 2024 | 4:53 PM

how too preserve gram flour : अनेकवेळा बदलत्या ऋतूमध्ये घरातील वस्तू लवकर खराब होऊ लागतात. विशेषतः बेसन पीठामध्ये किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा परिस्थितीमध्ये, स्वयंपाकघरातील वस्तूंचा किटकांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही सोप्या किचन टिप्स फॉलो करा.

kitchen hacks: बेसन पीठामधील कीटकांमुळे त्रस्त आहात? या सोप्या किचन ट्रिक्स करा फॉलो...
Follow us on

आजकाल वातावरणात अनेक बदल पहायला मिळतात. बदलत्या ऋतूमध्ये स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ खराब होण्याची भीती अस्ते. स्वयंपाक घरामध्ये अनेक धाण्यांचे पीठ ठेवलेलं अस्त. परंतु अनेकवेळा वातावरणातील अद्रतेमुळे पीठ खराब होते तर, जास्त दिवस ठेवल्यामुळे त्या पीठामध्ये किटकांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. अनेक पदार्थांमध्ये बेसनाच्या पीठाचा वापर केला जातो. बेसनाचं पीठ बनवण्यासाठी हरभऱ्याच्या डाळीचा वापर केला जातो. बेसन पीठ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. भजी, कढी, ढोकळा, लाडू, सोनपापडी असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी बसन पीठाचा वापर केला जातो.

बेसन पीठामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 यासारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. बेसनाच्या पीठाचा वापर पूर्वीच्या काळापासून त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जातो. अनेकांना पिंपल्स,, मुरुम सारख्या समस्या असतात. अशा लोकांना बेसनाचा फेस पॅक लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यासोबतच बेसनाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरिरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि तुमच्या पचनाचे आरोग्य सुधारते.

स्वयंपाकघरामध्ये बेसनाचं पीठ दिर्घकाळ चांगलं ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त दिवस बेसनाचे पीठ तसेच ठेवल्यामुळे ते खराब होऊ लागते आणि त्यांच्यामध्ये किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. चला जाणून घेऊया काही सोप्या ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही जास्त दिवस बेसनाचे पीठ चांगलं ठेवू शकता.

हे सुद्धा वाचा

बेसन हवाबंद डब्यात ठेवा

बेसनाचे पीठ दिर्घकाळ टिकवण्यासाठी नेहमी ते हवाबंद डब्यामध्ये ठेवा ज्यामुळे हवा आणि वातावरणातील ओलावा त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. बेसन या पद्धतीनं साठवल्यामुळे ते जास्त दिवस चांगले रहाते आणि त्याची चव टिकून रहाते.

थंड आणि कोरड्या जागी ठेवा

बेसन पीठ नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवा. बेसन पीठ आर्द्र जागी ठेवल्यामुळे त्याला बुरशी लागण्यााची किंवा कीटक वाढू शकतात, ज्यामुळे पीठ खराब होऊ शकते.

बेसन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते. बेसन जास्त काळ साठवून ठेवायचे असेल तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा ते ओलावा आणि कीटकांपासून सुरक्षित असेल.

सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

बेसनाचे पीठ थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नये यामुळे बेसन लवकर खराब होऊ शकते. बेसन पीठ सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यामुळे त्यामध्ये ओलावा साठतो.

स्वच्छ आणि कोरडे चमचे वापरा

बेसन पीठ डब्यामधून बाहेर काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा. असे केल्यामुळे बेसन पीठाच्या डब्यामध्ये ओलावा होणार नाही आणि ते लवकर खराब होणार नाही.

खरेदी करण्यापूर्वी तपासा

दुकानातून बेसन पीठ विकत घेण्यापूर्वी, त्यात कोणताही ओलावा किंवा कीटक नसल्याची खात्री करून घ्या त्यासोबतच कोणत्याही प्रकारची दुर्गंधी नाही या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

खरेदी करण्यापूर्वी तपासा

दुकानातून बेसन पीठ विकत घेण्यापूर्वी, त्यात कोणताही ओलावा किंवा कीटक नसल्याची खात्री करून घ्या त्यासोबतच कोणत्याही प्रकारची दुर्गंधी नाही या गोष्टीची विशेष काळजी घ्या.