Health Study | फळांचा रस पिणे आरोग्यदायी आहे का? वाचा आहार तज्ज्ञ काय म्हणतायत…

| Updated on: Feb 15, 2021 | 7:03 PM

फळांचा रस नेहमीच स्वस्थ आणि हेल्दी आहाराप्रमाणे सेवन केला जातो. दररोज फळांच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो, असा दावा केला जातो.

Health Study | फळांचा रस पिणे आरोग्यदायी आहे का? वाचा आहार तज्ज्ञ काय म्हणतायत...
फळांचा रस
Follow us on

मुंबई : फळांचा रस नेहमीच स्वस्थ आणि हेल्दी आहाराप्रमाणे सेवन केला जातो. दररोज फळांच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो, असा दावा केला जातो. परंतु, जर फळांच्या रसाची गणना साखर वाढवणार्‍या पेयांमध्ये केली गेली, तर रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि हाय इंसुलिन लठ्ठपणाचे एक मोठे कारण बनू शकते. चला तर, यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…(Know about fruit juice is it good for health)

आहार तज्ज्ञ म्हणतात की, फळांचा रस उन्हाळ्यात ‘रॉ फूड डाएट’प्रमाणे सेवन केला जातो. जो शरीर आतून थंड ठेवतो. यात फळ, सलाड आणि स्मूदी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तज्ज्ञ म्हणतात की, थंड फळे खाणे हे आरोग्यदायी आहे. त्याच वेळी, त्यात साखरेचे प्रमाण देखील जास्त आहे, जे फळांच्या पौष्टिक फायद्यांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडते.

मॅरेथॉन, हेवी वेट ट्रेनिंग आणि क्रीडा व्यायामानंतर शरीराची ऊर्जा मिळावी यासाठी फळांचा रस सेवन केला जातो. ज्यामध्ये आवश्यक पोषक घटक आणि नैसर्गिक साखर असते.

न्यूट्रिशनिस्ट्सच्या मते फळांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग :

– फळांच्या रसाऐवजी जर संपूर्ण फळ चावून खाल्ले, तर त्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढत नाही. तसेच इन्सुलिन देखील वाढत नाही. ज्यामुळे वजनही वाढत नाही.

– फळं खाण्याचा उत्तम काळ म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर. म्हणून, 4 वाजताच्या सुमारास फळे खाऊ नयेत. त्याऐवजी आपण 2 वाजताच्या सुमारास फळे खाऊ शकता. जर, आपण 12 वाजेपर्यंत खाल्ले तर, ते आरोग्याच्या दृष्टीने आयडियल ठरेल (Know about fruit juice is it good for health).

– फळ खाल्ल्यानंतर इतर अन्नपदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि वजन वाढू शकते. असे केल्याने अन्न अपचन आणि प्रकृती अस्वस्थ होऊ शकते.

– भाज्या बरोबर फळांचे सेवन केल्याने शरीराला चांगला फायदा होतो. जो यकृताला डीटॉक्सिफाय करण्यास आणि शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करतो. उदाहरणार्थ, पालकासह सफरचंद आणि संत्राच्या स्मूदी सेवन केल्या जाऊ शकतात. ज्यामध्ये थोडासे आले आणि मीठ घालू शकता.

– फळांचे सलाड, हर्ब्स, काही मसाले आणि मीठ टाकून खाल्ले जाऊ शकते. सकाळच्या वेळी मिड फिलर म्हणून फळे नट्स आणि अंड्या सोबत खाऊ शकता.

– दररोज हाय फायबर आणि कमी साखरयुक्त फळे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. या फळांमध्ये नाशपती, पेरू, पपई, सफरचंद, बोर आणि संत्री यांचा समावेश होतो. त्याच वेळी, आपण आठवड्यातून दोन दिवस उच्च साखरयुक्त फळे अर्थात केळी, आंबा, चिकू, द्राक्षे इत्यादी खाऊ शकता.

(Know about fruit juice is it good for health)

हेही वाचा :