Black Rice | पंतप्रधान मोदींनीही केली वाहवा, तुम्हाला माहित आहे का काळ्या तांदळाच्या फायद्यांबद्दल?

| Updated on: Feb 12, 2021 | 10:31 AM

अ‍ॅथेसॅनिनच्या विशिष्ट प्रकारच्या घटकामुळे या तांदळाचा रंग काळा असतो. तज्ज्ञांच्या मते, हे तांदूळ औषधी गुणांनी भरलेले आहे.

Black Rice | पंतप्रधान मोदींनीही केली वाहवा, तुम्हाला माहित आहे का काळ्या तांदळाच्या फायद्यांबद्दल?
अ‍ॅथेसॅनिनच्या विशिष्ट प्रकारच्या घटकामुळे या तांदळाचा रंग काळा असतो.
Follow us on

मुंबई : आपण पांढरा आणि करडा अर्थात ब्राऊन तांदूळ खाल्ला असेल, परंतु आपण कधी काळे तांदूळ वापरला आहे का? काळा तांदूळ म्हणजे ब्लॅक राईस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गेल्या वर्षी आपल्या भाषणात या तांदळाचा उल्लेख केला होतं. आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीत चंदौलीच्या काळ्या तांदळाचा संदर्भ देताना केलेल्या भाषणादरम्यान ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगितले जात होते. परंतु, काळा तांदूळ केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठीच फायदेशीर ठरत नाही, तर सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठीही आहे. चला तर, त्याचे फायदे जाणून घेऊया…(Know about Health Benefits of Black Rice)

अ‍ॅथेसॅनिनच्या विशिष्ट प्रकारच्या घटकामुळे या तांदळाचा रंग काळा असतो. तज्ज्ञांच्या मते, हे तांदूळ औषधी गुणांनी भरलेले आहे. व्हिटामिन ई, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असलेला काळा तांदूळ भारतातही मुबलक प्रमाणात आढळतो. त्याच्या सेवन केल्याने रक्ताचे शुद्धीकरण होते आणि त्याचबरोबर यामुळे चरबी कमी करून वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते, तसेच पाचनशक्ती देखील वाढवते.

हृदयविकाराचा धोका कमी करते

काळ्या तांदळामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते, जे हृदयासाठी चांगले मानले जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. अँटिऑक्सिडेंटनी समृद्ध असल्यामुळे ते आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. याव्यतिरिक्त, हे शरीरातील विषारी घटक काढून टाकते, त्वचा चमकदार करते आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर ठरते. मधुमेह आणि संधिवात असलेल्या रूग्णाच्या आरोग्यासाठीही काळा तांदूळ चांगला मानला जातो.

भावातही अव्वल

तज्ज्ञांच्या मते, या भातांची लागवड उत्तर प्रदेशातील मिर्जापूर आणि चांदौली आणि मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातही केली जाते. साधारण भातशेतीपेक्षा या तांदळाची लागवड कमी करतात. तामिळनाडू, बिहार, राजस्थान, मुंबई, हरियाणा आणि परदेशातही या तांदळाची मागणी वाढत आहे. 300 ते 350 रुपयांपर्यंत किलो या भावाने हे तांदूळ विकले जातात (Know about Health Benefits of Black Rice).

काळ्या तांदळाचे फायदे

भात हा भारतीय आहारातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु भाताच्या अति सेवनामुळे अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोगाच्या संबंधित व्यक्तींना तर बऱ्याचदा डॉक्टर भात वर्ज करण्यास सांगतात. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात काळ्या तांदळाचा भात समाविष्ट केलात तर त्यामुळे तुम्हाला अनेक व्याधींना दूर ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो.

या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी करता येऊ शकतं, असाही दावा करण्यात आला आहे. हा बहुउपयोगी काळा भात पिकण्याचे प्रमाण मात्र कमी असले, तरी या पिकाचे एकरी 13 ते 15 क्विंटल उत्पन्न येते, जे नियमित भात पिकापेक्षा कमी आहे, परंतु या भाताला भाव मात्र नियमित मागणी असलेल्या भातापेक्षा 4 ते 5 पट मिळतो.

(Know about Health Benefits of Black Rice)

हेही वाचा :