नवी दिल्ली – कोरफड (aloe vera) ही वनस्पती औषधी गुणधर्मांनीयुक्त आहे. कोरफडीचे सेवन करणे हे आपले आरोग्य, त्वचा, केस आणि सौंदर्य यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात कोरफडीला संजीवनी म्हटले जाते. त्याचा रस आरोग्यासाठी (aloe vera juice) खूप फायदेशीर आहे. कोरफडीच्या रसामध्ये लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि इतर अनेक पोषक घटक (nutritions) असतात. त्याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
कोरफडीच्या रसाचे फायदे जाणून घेऊया.
1) पचनासाठी फायदेशीर
कोरफडीच्या रसामध्ये लॅक्टेसिव्ह आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. बद्धकोष्ठता, ॲसिडिटी इत्यादी समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी हे प्रभावी आहे. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर कोरफडीच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
2) मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध
कोरफडीचा रस सेवन करणे हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जाते. विशेषत: टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांनी कोरफडीचा रस प्यायल्यास त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकते.
3) वजन कमी करण्यासाठी सहाय्यक
कोरफड शरीरातील गोठलेले फॅट्स वेगाने बर्न करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कोरफडीचा रस सेवन करू शकता. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
4) शरीराची जळजळ कमी होते
कोरफडी रसामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच फ्री- रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी कोरफडीचा रस प्रभावी ठरतो.
5) तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
कोरफडीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तज्ज्ञांच्या मते, कोरफडीचा रस हा दातदुखी कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो.
6) त्वचेसाठी फायदेशीर
कोरफडीचा रस प्यायल्याने तुम्ही त्वचेच्या समस्या टाळू शकता. यामध्ये अँटी-इंन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)