नवी दिल्ली – सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentines week) सुरू आहे, सगळीकडे प्रेमाचे वार वाहत आहे. आज प्रपोज डे (propose day) आहे, या नावावरूनच या दिवसाचे महत्व कळते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर रहायचे असेल किंवा लग्न करण्याची इच्छा असेल तर हा दिवस खूपच विशेष ठरतो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी हा दिवस उत्तम असतो. प्रपोज करताना तुम्ही केक, फुलं, एखादी रिंग किंवा त्या व्यक्तीची आवडती वस्तू देऊ शकता. बॉलीवूडपासून ते खऱ्या आयुष्यात आपण सर्वांनी अनेकदा लोकांना गुडघ्यावर बसून (sitting on one knee)प्रेम व्यक्त करताना पाहिले असेल. पण हे असं प्रपोज का केलं जातं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत नेमकी कशी सुरू झाली ? चला जाणून घेऊया.
कशी सुरू झाली परंपरा ?
गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याच्या या परंपरेच्या सुरुवातीचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. मात्र, हा असा प्रस्ताव म्हणजे ‘वचन’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते ही परंपरा मध्ययुगीन काळात सुरू झाली. त्या काळात उच्चभ्रू महिलांसमोर योद्धे गुडघे टेकत असत. तसेच गुडघे टेकणे हे देखील अनेक औपचारिक विधींसाठी एक प्रोटोकॉल होता. त्याची झलक त्या काळातील अनेक चित्रांमध्ये दिसते. त्यावेळी शूरवीर आपल्या परमेश्वरासमोर गुडघे टेकायचे. ते त्यांच्या प्रती असलेल्या आदराचे लक्षण होते.
आता प्रपोज करण्यासाठी एका गुडघ्यावर बसणे हे आपल्या जोडीदाराबद्दल असलेल्या आदराचे लक्षण आहे. (प्रपोज करणाऱ्या) त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य आता समोरच्याच्या हातात आहे, असाही या प्रकारे प्रपोज करण्याचा अर्थ होतो.
कोणत्या गुडघ्यावर बसून केले जाते प्रपोज ?
सहसा लोक डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. असे केले जाते कारण बहुतांश लोक हे उजव्या हाताचा अधिक वापर करतात. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करते, तेव्हा उजव्या हाताने अंगठीचा बॉक्स उघडणे त्याच्यासाठी सोपे असते. पण तुम्ही जर डावरे किंवा लेफ्टी असाल तर उजव्या गुडघ्यावर बसूनही प्रपोज करू शकता. एखादे लाल गुलाबाचे फूल, अंगठी किंवा त्या व्यक्तीची आवडती गोष्ट देऊन, एखादी कविता म्हणून अनोख्या अंदाजात प्रपोज करता येते. तुम्ही एखादी रोमॅंटिक डेटही प्लान करू शकता.