मुंबई : भगवान शंकराला देवांचा देव ‘महादेव’ म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला कोणत्याच अपेक्षा, लोभ नाही तोच व्यक्ती महादेव असू शकतो. मनुष्याच्या स्वाभाव हा कामाच्या बदल्यात मोबदला असा असतो. मात्र, महादेव एकमात्र असे आहेत जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ते नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात (Know how mahadev becomes Nilkanth and what is tandav).
मृगचर्म, साप, भस्म हे महादेवाचे साथी आहेत. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. अनेक देवता, भक्त त्यांच्या कृपेची याचना करतात. त्यांची स्वतःची कोणतीच इच्छा नाहीये. मात्र, केवळ एक बेलपत्र समर्पित केल्यानंतर प्रसन्न होतात. भौतिक सुखात न रमणारे महादेव आत्माराम आहेत. त्यांना शरण जाणाऱ्या भक्ताची मृत्यूची भीती समुळ नष्ट करणारे ते ‘महादेव’ आहेत.
देव आणि दानवांच्या वादात समुद्र मंथनाचा पर्याय समोर आला होता. यावेळी त्यातून बाहेर आलेली रत्ने आणि अमृत स्वीकारण्यास बरेच हात पुढे आले. मात्र, समुद्र मंथनात जेव्हा विष बाहेर आले तेव्हा कोणतेही देव-राक्षस व मानव ते स्वीकारण्यास पुढे आले नाही. फक्त महादेव ते विष प्राशन करण्यास पुढे आले. ते विष महादेवांनी स्वतः प्राशन केले.
यावेळी महादेवांच्या पत्नी, माता पार्वती यांनी त्यांचा कंठ धरून ठेवला. यामुळे विष महादेवांच्या पोटात न जाता कंठात धारण करून ठेवले. यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना ‘निळकंठ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. फक्त बेल पत्र, धतुरा यांनी संतुष्ट होऊन, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विष स्वीकारले.
वेदांनुसार निसर्गाच्या प्रत्येक कणाकणांत संगीत अस्तित्त्वात आहे. भगवान शिवाला अर्थात महादेवांना या संगीताचे जनक मानले जाते. शिव महापुराणात असे म्हटले आहे की, या जगातील महादेवाच्या पहिल्या संगीताची कोणालाही माहिती नव्हती. नंतर, जर संगीत निसर्गाचा एक भाग बनला, तर त्यामध्ये महादेवाची महत्त्वाची भूमिका आहे. भगवान शिवाविषयी असे म्हटले जाते की, या विश्वात प्रथम शिवाचे आगमन झाले होते. वास्तविक, तांडव ही नृत्याची एक शैली आहे जी महादेवाशी संबंधित आहे(Know how mahadev becomes Nilkanth and what is tandav).
भगवान शिव दोन प्रकारचे तांडव नृत्य करतात. जेव्हा त्यांचा राग येतो, तेव्हा रुद्र स्वरूपात तांडव नृत्य करतात. तर, दुसरे तांडव करताना ते डमरू वाजवतात. शिव जेव्हा डमरू वाजवून नाचतात तेव्हा, ते पूर्ण आनंदात असल्याचे मानले जाते. भगवान शिवाचा हा ‘तांडव’ नटराज स्वरूपाचे प्रतीक आहे. तांडवबद्दल असे म्हणतात की, जेव्हा भगवान शिव हे नृत्य करतात, तेव्हा ते त्यांच्या उत्कृष्ट रूपात असतात. येथे नटराजाचा अर्थ ‘नट’ म्हणजेच कलेशी निगडित आहे आणि भगवान शिव यांना कलेचा सर्वोच्च प्रेमी मानले जाते.
शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधी अवस्था आणि दुसरी म्हणजे तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. समाधी अवस्था, म्हणजे निर्गुण अवस्था आणि नृत्यावस्था म्हणजे सगुण अवस्था. ‘एखादी निश्चित घटना अथवा विषय अभिव्यक्त करण्यासाठी जे अंगचालन केले जाते, त्याला ‘नटन अथवा नाट्य’ अशी संज्ञा आहे. हे नाट्य करणाऱ्याला नट म्हटले जाते. नटराज या रूपात शिवाने नाट्यकलेची निर्मिती केली, अशी पारंपरिक धारणा आहे. शिव हा आद्यनट आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला नटराज हे बिरुद लागले आहे.
‘ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाळा आहे. तो जसा नर्तक आहे, तसाच त्याचा साक्षीही आहे. जेव्हा त्याचे तांडव चालू होते, तेव्हा त्या झंकाराने सर्व विश्वव्यापाराला गती मिळते आणि जेव्हा त्याचे नृत्य विराम पावते, तेव्हा हे चराचर विश्व आपल्यात सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन रहातो’, अशी नटराज कल्पनेमागची भूमिका आहे. थोडक्यात नटराज हे ईश्वराच्या सगळ्या क्रिया-प्रतिक्रियांचे प्रतीरूप आहे(Know how mahadev becomes Nilkanth and what is tandav).
या सात प्रकारांपैकी संध्यातांडवाचे वर्णन शिवप्रदोष स्तोत्रात आले आहे. वरील सात प्रकारांपैकी ‘गौरीतांडव’ आणि ‘उमातांडव’ ही दोन्ही उग्र स्वरूपाची नृत्ये आहेत. या नृत्यांत शिव हा ‘भैरव’ अथवा ‘वीरभद्र’ या स्वरूपात असतात, त्यांच्यासह उमा अथवा गौरी देखील असते(Know how mahadev becomes Nilkanth and what is tandav).
‘नटराज’ रुपातील महादेवाची प्रतिमा पाहिल्यास त्यात चार हात दिसतात. त्यांच्याभोवती अग्निचे एक मंडळ दिसते. त्यांनी उजव्या हातात डामरू धरला आहे. येथे डमरूचा आवाज सृष्टीचे प्रतीक आहे, ज्याचा नाद सतत निसर्गामध्ये घुमत राहतो. दुसर्या हातात आग आहे. येथे आग विनाशाचे प्रतीक आहे. म्हणूनच, नटराजांच्या रूपात भगवान शिव सृष्टीचे तारक तसेच विनाशाचे प्रतीक आहेत. दुसरा उंचावलेला उजवा हात लोकांच्या हितासाठी, आशीर्वाद देण्याच्या पवित्र्यामध्ये आहे.
भगवान शिवाचा दुसरा डावा हात त्याच्या उंचावलेल्या पायाकडे निर्देशित करतो. याचा अर्थ असा की, शिव मोक्षाचा मार्ग सुचवतो. भगवान शिव यांच्या या स्वरूपावरून हे स्पष्ट होते की, ते सृजनाबरोबरच विनाशही करू शकतात. त्यांच्या सभोवताल उगवत्या ज्वाळा या विश्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या शरीरावर सापांची एक कुंडलिनी देखील आहे, जी सामर्थ्यचे प्रतिक आहे. शिवची ही संपूर्ण आकृती ‘ऊं’ आकारात दिसते, ज्याबद्दल असे म्हणतात की विश्व पूर्णपणे शिवात सामावलेले आहे.
(Know how mahadev becomes Nilkanth and what is tandav)
अवघ्या विश्वाला हादरवणाऱ्या ‘तांडव’चं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या महादेवाच्या या निर्मितीबद्दल…#Tandav | #Mahadev | #TandavControversy https://t.co/TDTrJNValv
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021