Food | तुम्ही देखील ‘या’ प्रकारे सलाड खाताय? थांबा, आधी जाणून घ्या सलाड खाण्याची योग्य पद्धत…

| Updated on: Feb 16, 2021 | 12:46 PM

हिरवेगार सलाड खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे. परंतु, आपल्यापैकी बहुतेकांना माहित नाही की सलाड खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

Food | तुम्ही देखील ‘या’ प्रकारे सलाड खाताय? थांबा, आधी जाणून घ्या सलाड खाण्याची योग्य पद्धत...
सलाड
Follow us on

मुंबई : लोक बर्‍याचदा अन्नग्रहण करताना प्रथम सलाड खाणे पसंत करतात. काही तर आपल्या नियमित आहारात याचा समावेश करतात. तथापि, सलाड खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सलाड आपल्या आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता भरून काढते, जे बहुतेक वेळा स्वयंपाक करताना कमी झालेले असतात. सलाडद्वारे शरीराला केवळ जीवनसत्त्वे आणि खनिज घटक मिळतात असे नाही, तर यामुळे आपल्या शरीरातील फायबरचा अभाव देखील कमी होतो (Know how to eat salad in right way for good health).

हिरवेगार सलाड खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे. परंतु, आपल्यापैकी बहुतेकांना माहित नाही की सलाड खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? या कारणास्तव, आपल्या आरोग्यावर याचा हवा तसा परिणाम होत नाही आणि कधीकधी याचे सेवन आपल्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात आपण सलाड खाणे टाळावे. जर, आपण यामध्ये थोडेसाही निष्काळजीपणा करत असाल, तर आपल्याला अन्न विषबाधा सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आहारतज्ज्ञ काय सांगतात?

जर आपण एखाद्या आहारतज्ज्ञाला विचारले, तर ते आपल्याला आहाराबरोबर सलाड खाण्याचा सल्ला देणार नाहीत. आपण हे बर्‍याचदा असे केल्यास आपल्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. डाएटिशियन सल्ला देतात की, सलाड जेवणाच्या किंवा काहीही खाण्याच्यापूर्वी खावे. आपण जेवणाच्या अर्धा तास किंवा एक तास आधी सलाड खाऊ शकता.

वास्तविक, यामागील कारण असे आहे की, जेवणाच्या आधी सलाड खाल्ल्याने आपल्याला भोजन करताना भूक कमी लागते. यामुळे आपण आहारात कमी कार्बोहायड्रेट घेता. जे आपले वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. तसेच, आपल्या शरीराला त्यातून बरेच प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात (Know how to eat salad in right way for good health).

‘या’ गोष्टींची काळजी घ्या!

आहारतज्ज्ञांच्या मते, सलाडमध्ये कधीही मीठ घालू नये. जर तुम्हाला त्यावर मीठ टाकून खाणे आवडत, असेल तर त्यासोबत सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट वापरण्याचा प्रयत्न करा. तथापि, जास्तवेळ आधीच कापून ठेवेलेल सलाड सेवन करू नये. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया खूप सक्रिय असतात. म्हणूनच, या दिवसांत सलाड अधिक वेळ उघडे ठेऊ नये, तसेच कमी प्रमाणात खावे. खासकरुन रात्रीच्या वेळी सलाड खाणे टाळावे. रात्री काकडी खाऊ नये.

सलाड खाण्याचे फायदे :

– सलाड खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोट साफ राहते. फायबर्सने परिपूर्ण असे सलाड खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे आतडी आतून स्वच्छ होऊन, बद्धकोष्टता दूर होते आणि पचनासंबधित सर्व विकारांना आळा बसतो.

– यातील भाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरातील जीवनसत्वांचा अभाव सलाड खाल्ल्याने दूर होतो.

– वजन कमी करण्यासाठी सलाड उत्तम. जेवण कमी करून सलाडचे प्रमाण वाढवल्याने पोटही भरते, त्याचबरोबर वजनही वाढत नाही.

– याच्या सेवनाने त्वचा तजेलदार होऊन, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

– शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन, हृदय रोगांपासून बचाव होतो

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know how to eat salad in right way for good health)

हेही वाचा :