मुंबई : नवजात शिशुच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मालिश करणे फार महत्वाचे मानले जाते. मालिशमुळे बाळाला भरपूर आराम मिळतो आणि चांगली झोपही येते. यामुळेच विशेषत: भारतात बाळांच्या मालिशची परंपरा शतकानुशतके चालू आहे. मालिश से बच्चों को काफी आराम मिलता है और उन्हें अच्छी नींद आती है. याशिवायही मालिश करण्याचेही बरेच फायदे आहेत. मालिशमुळे बाळाच्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन संप्रेरक उत्तेजित करते, असे अनेक संशोधनातून निष्पन्न झाले आहे. ज्यामुळे बाळाला बरे वाटते आणि त्यांची चिडचिड कमी होते. याशिवाय बाळाची स्नायूंनाही आराम मिळतो. मालिश केल्याने बाळाची मज्जासंस्था देखील उत्तेजित होते. रक्ताभिसरण चांगले होते आणि पचनासंबंधी समस्या कमी होतात. (know how to massage a new born baby)
जन्माच्या सुमारे चार आठवड्यांनंतर बाळाची मालिश सुरू केली जाऊ शकते. मात्र नाळ पडल्यानंतर आणि सुकल्यानंतरत मालिश करावी. बाळाची त्वचा सहसा चार आठवड्यांनंतर विकसित होते. बाळाच्या चांगल्या वाढीसाठी नियमितपणे मालिश करणे आवश्यक आहे. परंतु जर बाळाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्याबद्दल तज्ञांचा सल्ला घ्या.
1. मालिश नेहमी पायापासून सुरु करावी, डोक्याची मालिश शेवटी करावी
2. सर्वप्रथम तेलाचे काही थेंब हातावर घेऊन रगडा. यामुळे तेलात हलकीशी गरमी निर्णाण होईल आणि त्यानंतर हळू हळू बाळाच्या त्वचेवर लावा.
3. बाळाच्या मांडीवर हलके गोलाकार हात फिरवत खालच्या बाजूला आणा. हाच क्रम हातावरही ठेवा. यावेळी बाळाची बोटे सावधानीने पकडा
4. बाळाची छाती आणि पोटावर हलक्या हाताने हळू हळू गोलाकार फिरवा. यानंतर बाळाला उलटे झोपवून पाठ मालिश करा. यावेळी बाळाच्या मणक्यावर अजिबात ताण येणार नाही याची काळजी घ्या. (know how to massage a new born baby)
CM Uddhav Thackeray Live : आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय @CMOMaharashtra @OfficeofUT pic.twitter.com/09DMxzJScT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
इतर बातम्या
गरोदरपणात थायरॉईडची समस्या आहे? मग अजिबात निष्काळजीपणा करु नका
Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा..’, अभिनेत्री काजल अग्रवालचं नवं फोटोशूट