How to Use Tea Leaves For Skin Care : चहा फक्त पिण्यासाठी नव्हे तर झाडांसाठी तसेच आपल्या स्किनसाठीही (skincare) उपयोगी ठरतो. आपण आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करतो. पण तुम्ही कधी चहा पावडरचा (tea leaves) स्किन केअरसाठी वापर केला आहे का ? चहा पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
त्वचेची देखभाल करण्यासाठी चहा पावडरचा स्क्रब वापरणे शक्य आहे. यासाठी चहाची पाने थोड्या पाण्यात टाकून उकळा. नंतर त्याचे पाणी काढून उरलेली पावडर स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्यामध्ये थोडा मध, गुलाब जल, तांदळाचे पीठ व लिंबाचा रस घालून स्क्रब तयार करा व चेहऱ्याला लावून मसाजा करा. हे पंधरा मिनिटे ठेवावे नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा
टॅनिंग होईल दूर
टॅनिंग दूर करण्यासाठी चहा पावडर खूप प्रभावी ठरते. वास्तविक, चहाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासून मुक्त करण्यात मदत करतात. याच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम होते.
डेड स्कीन निघते
त्वचेवरील डेड स्कीन काढून टाकण्यासाठी चहाची पावडर उपयुक्त ठरते. यासाठी चहाच्या पानांचा स्क्रब बनवून पंधरा दिवसांतून एकदा वापरू शकता. यामुळे त्वचा मुलायम होते आणि चमकतेही.
डार्क सर्कल्स कमी होतात
डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा येते. ही समस्या कमी करण्यासाठीही देखील चहा पावजरीचा स्क्रब अतिशय उपयोगी ठरतो. त्यामुळे डार्क सर्कल्स तर कमी होतातच पण त्वचाही सॉफ्ट होते.
तेलकट त्वचेवरील उत्तम उपाय
तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर करू शकतो. मुबलक भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असल्यामुळे चहाची पाने तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यातही चांगली भूमिका बजावतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)