नवी दिल्ली – आयुर्वेदात चंदन (Sandalwood) हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. वर्षानुवर्षे आयुर्वेदात विविध रोगांच्या उपचारांसाठी चंदनाचा वापर केला जातो. मात्र, केवळ आयुर्वेदच नव्हे तर वैद्यकीय शास्त्रानेही त्याचे फायदे सिद्ध केले आहेत. विशेषत: त्वचेशी संबंधित (skin care) समस्यांवर चंदन हा एक उत्तम उपचार ठरू शकतो. अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-एजिंग, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले चंदन, त्वचेसाठी (use of Sandalwood for skin) वापरल्यास बरेच फायदे मिळू शकतात.
आजकाल फेस वॉशपासून ते बॉडी लोशनपर्यंत अनेक प्रकारच्या स्किन केअर उत्पादनांमध्ये चंदनाची वापर केलेला दिसतो. चंदन त्वचेसाठी कसे वापरावे व त्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊया.
1) वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते
चंदनामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींना निरोगी ठेवतात आणि त्यांना अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांपासून दूर ठेवतात. चंदन हे त्वचेला पुरेसा ओलावा प्रदान करते, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी राहते. याव्यतिरिक्त, त्यामुळे त्वचेची लवचिकता देखील राखली जाते. अँटिऑक्सिडेंट-समृद्ध चंदन त्वचेला फ्री- रॅडिकल्सपासून वाचवते आणि बारीक रेषा आणि सुरकुत्यांपासून देखील संरक्षण करते.
2) त्वचेवरील डाग कमी करते
त्वचेच्या पेशींची लवचिकता टिकवून ठेवणारे चंदन किंवा चंदन तेल वापरून त्वचा पुरेशी हायड्रेट होऊ शकते. चंदनाच्या वापरामुळे त्वचेवर डाग आधीपासूनच असलेले डाग देखील कमी होतात. त्वचेवरील हट्टी आणि जुन्या डागांपासून मुक्त होण्यासाठी चंदन आणि मधाचा वापर हा एक उत्तम उपाय आहे.
3) मुरुमांपासून त्वरित आराम मिळतो
एका अभ्यासानुसार, चंदनाचा वापर मुरुमे घालवण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. चंदनाच्या वापरामुळे मुरुमांचा त्रास असलेल्या रुग्णांच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
4) त्वचेला मिळते नैसर्गिक चमक
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पिगमेंटेशनचा त्रास होऊ शकतो, तसेच त्वचेच्या टोनमध्ये बदल होऊ शकतो. यामुळे त्वचेची नैसर्गिक कमी होते. अशा स्थितीत थंड गुणधर्म असलेल्या चंदनाचा वापर केल्यास त्वचेचा टोन पूर्ववत होतो तसेच पिगमेंटेशनचा त्रासही कमी होतो. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांचा त्वेचवरील प्रभाव कमी होतो.
चंदनाचा कसा करावा वापर
1) तेलकट त्वचेसाठी :
साहित्य – चंदन पावडर व गुलाबपाणी
कृती – एका भांड्यात दोन चमचे चंदन पावडर घेऊन त्यात गुलाबजल टाका. ते लावण्यापूर्वी तुमचा चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर चंदनाचे मिश्रण त्वचेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. थोड्या वेळाने कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. जर चंदनाची पेस्ट उरली असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी तु्म्ही ती पुन्हा वापरू शकता.
2) मुरुमांसाठी :
साहित्य – चंदन पावडर, टी ट्री ऑईल, गुलाब जल किंवा लॅव्हेंडर वॉटर
कृती – एका लहान भांड्यात एक चमचा चंदन पावडर घाला, नंतर एक ते दोन थेंब टी ट्री ऑइल आणि एक चमचा गुलाब किंवा लॅव्हेंडर वॉटर घाला आणि सर्व साहित्य एकत्र मिसळा. मात्र हे त्वचेवरक लावण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेच्या त्वचेवर लावा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी बोटांच्या मदतीने मसाज करा. हे मिश्रण त्वचेवर 10 ते 15 मिनिटे राहू द्या. सुकल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा.
3) कोरड्या त्वचेसाठी :
साहित्य – चंदन पावडर, दही किंवा गाईचे दूध
कृती – सर्वप्रथम, एका लहान भांड्यात चंदन पावडर आणि दही चांगले मिसळा. जर दही तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर तुम्ही दूध वापरू शकता. आता ही पेस्ट त्वचेवर लावा. आणि त्वचेला 2 ते 3 मिनिटे मसाज करा. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. थोड्या वेळाने पॅक वाळल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.