नवी दिल्ली : नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात, कारण त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे नारळही (coconut) अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. नारळाचे प्रत्येक रूप मग ते सुकं खोबरं असो, ओला नारळ असो किंवा त्यातील पाणी आणि मलई, प्रत्येक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबर असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे व पोषक असते. त्याच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते तसेच वजनही नियंत्रणात (weight in control) राहते. पण नारळाचे गोड पदार्थ, वडी , लाडू वगैरे मिठाई, हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी अजिबात चांगला पर्याय नाहीत. त्यांच्या सेवनाने त्यांना आणखी त्रास होऊ शकतो, म्हणून ते टाळले पाहिजेत.
नारळाचा मधुमेहाच्या रुग्णांना कसा फायदा होतो, ते जाणून घेऊया.
नारळाचे पौष्टिक फायदे:
– नारळात लॉरिक ॲ सिड सारख्या नैसर्गिकरीत्या सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. लॉरिक ॲ सिड आपल्या शरीरात “मोनोलॉरिन” मध्ये रूपांतरित होते, ते एक फायदेशीर कंपाऊंड असते जे रोग निर्माण करणाऱ्या अनेक जीवांना मारते.
– नारळाच्या सेवनाने सामान्य सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गापासूनही बचाव होतो.
नारळात काही पोषक घटक देखील असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असू शकतात :
• व्हिटॅमिन सी
• थायमिन (व्हिटॅमिन बी1)
• फोलेट
• पोटॅशिअम
• मँगनीज
• कॉपर
• सेलेनियम
• लोह
• फॉस्फरस
• पोटॅशिअम
नारळ हा फायबरचा उत्तम स्रोत आहे
नारळ हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. ताज्या नारळाच्या एका लहान तुकड्यात 4 ग्रॅम आहारातील फायबर असते, जे तुमच्या रोजच्या सेवनाच्या 16 टक्के असते. त्यामुळे असे म्हणता येईल की दिवसभरात फक्त 2 टक्के कार्बोहायड्रेट्सच्या बदल्यात इतकं फायबर देणारा नारळ हा मधुमेहींसाठी निश्चितच आरोग्यदायी व फायदेशीर पर्याय आहे.
लक्षात ठेवा काही गोष्टी
आपल्या आहारातील इतर सर्व गोष्टींप्रमाणे, नारळासंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
– नारळात चरबीचे विशेषत: “सॅच्युरेटेड फॅट” (सॅच्युरेटेड फॅट), चे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या वाढलेल्या वजनाचा त्रास होत असेल तर नारळ मर्यादित प्रमाणात खा. शिवाय, नारळ हळूहळू पचतो, जो तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करू शकतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही हलका नाश्ता केला तर नारळाचे सेवन केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात आणि शुगर मॅनेज करण्यात, या दोन्ही गोष्टींमध्ये मदत करते.
– माफक प्रमाणात खाल्लेला ताजा नारळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे ताजा नारळ नसेल, तर सुमारे 28-30 ग्रॅम डेसिकेटेड नारळ देखील 2 इंच ताज्या नारळाच्या इतकेच पोषक असते. त्यामुळे तुम्हीही डेसिकेटेड कोकोनटही खाऊ शकता.
– पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे,सुपरमार्केटच्या बेकिंग सेक्शनमधून मिळणारे नारळाचे कोणतेही पदार्थ टाळा. कारण त्यात साखरेचा समावेश असतो, जो मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर नसतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)