नवी दिल्ली : बहुतांश लोकं चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा (facewash) वापर करतात. मात्र चेहरा धुण्यासाठी साबण (soap for face) वापरणऱ्या लोकांची संख्याही कमी नाही. पण चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचेला खूप नुकसान (skin problems) होते हे बहुतेकांना माहीत नसते. साबण एक शक्तिशाली क्लिंजर असला तरी त्याच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक हिरावली जाऊ शकते.
त्वचा तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, साबण हा सर्वात वाईट स्किन प्रॉडक्टसपैकी एक आहे. साबण केवळ त्वचेचाच नव्हे तर तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा देखील काढून टाकू शकतो. त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही दररोज चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करत असाल तर ते लगेच बंद करा. कारण असे केल्याने तुमची त्वचा कोरडी, खडबडीत, निर्जीव होऊ शकते आणि त्याहूनही जास्त आर्द्रता हिरावून घेतली जाऊ शकते.
त्वचेसाठी साबण वापरण्याचे साईड इफेक्ट्स
साबण त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करतो. प्रदूषणामुळे, फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करते आणि त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकते. साबणात जरी अनेक गुण असले तरीही त्याचा चेहऱ्यावर नियमित वापर करणे टाळले पाहिजे. साबण लावल्याने तुमच्या त्वचेचे कोणकोणते नुकसान सहन करावे लागू शकते ते जाणून घेऊया.
1) अकाली वृद्धत्व : साबणातील रसायने विषारी, जीवाणू आणि इतर घाणेरडे कण त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जाऊ देतात. यामुळे त्वचा खराब होऊ लागते. चेहऱ्यावर साबणाचा सतत वापर केल्याने लालसरपणा, कोरडेपणा, चिडचिड, खाज आणि सुरकुत्या होऊ शकतात. त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते.
2) त्वचेच्या मायक्रोबायोमला हानी पोहोचवते : त्वचेमध्ये विविध प्रकारचे रोगजनक (पॅथोजन) आढळतात, जे हानिकारक जीवाणू, विषाणू आणि बुरशीच्या हल्ल्यापासून त्वचेच्या थरांचे संरक्षण करतात. त्यांना स्किन मायक्रोबायोम म्हणून देखील ओळखले जाते. साबणातील रसायने त्वचेची आम्लता कमी करतात आणि बरेच चांगले बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळेच लोकांना अनेकदा त्वचेवर जळजळ, संसर्ग आणि मुरुमे, आणि चामखीळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
3) स्किन पोर्स होतात ब्लॉक : साबणाचा नियमित वापर त्वचेच्या पृष्ठभागावरील छिद्रं बंद होऊ शकतात. त्वचा तज्ज्ञांच्या मते, असे घडते, कारण बहुतेक साबणांमध्ये फॅटी ॲसिड असतात, जे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होतात आणि त्यांना ब्लॉक करतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स, ब्रेकआऊट, इन्फेक्शन अशा समस्या उद्भवू लागतात.
4) व्हिटॅमिन्स काढून टाकते : साबण त्वचेतील जीवनसत्त्वे काढून टाकतो, जे त्वचेला निरोगी आणि ताजे ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की साबणातील मजबूत रसायने त्वचेतून व्हिटॅमिन डी काढून घेतात.