आता अंतराळवीरांना अवकाशातही चाखायला मिळणार ‘रसगुल्ला’, जाणून घ्या याचा इतिहास…

| Updated on: Feb 17, 2021 | 10:39 AM

बंगाल आणि ओडिशामध्ये या मिष्टान्नावरून बरीच रस्सीखेच सुरु आहे. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा भारतीय गोड पदार्थ, लाखो भारतीयांची पसंत आहे.

आता अंतराळवीरांना अवकाशातही चाखायला मिळणार ‘रसगुल्ला’, जाणून घ्या याचा इतिहास...
रसगुल्ला
Follow us on

मुंबई : रसगुल्लावर गेल्या बराच काळ गोंधळ उडालेला दिसला आहे. हा गोड पदार्थ कोणाच्या ताटात वाढला जातोय, यावरून मारामारी देखील पाहायला मिळाली. परंतु, जेव्हा तो आपल्या प्लेटमध्ये येतो, तेव्हा एकाच घासात खाऊन संपवावासा वाटतो. गोड गोड रसगुल्ला केवळ आपल्या तोंडातच नव्हे, तर आपल्या जीवनातही गोडवा आणतो, थोड्या काळासाठी आपल्या जीवनात आनंदाचे रंग पसरतात (Know the history of rasgulla how astronauts can bring this in space).

बंगाल आणि ओडिशामध्ये या मिष्टान्नावरून बरीच रस्सीखेच सुरु आहे. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे की, हा भारतीय गोड पदार्थ, लाखो भारतीयांची पसंत आहे. रसगुल्लाचे दोन प्रकार सध्या चर्चेत आहेत, पहिला म्हणजे बंगालचा रसोगुल्ला आणि दुसरा रसगुल्ला ओडिशाचा, जे वेगवेगळ्या भौगोलिक संकेतांसह ओळखला जात आहे. हॉटेलमध्ये, घरात किंवा एखाद्या फंक्शनमध्ये लोक आपल्याला रसगुल्लाचा स्वाद घेताना भेटतील. लोक याचे इतके दिवाने आहेत, की काय बोलावे…

ओडिशाचा दावा

ओडिशाच्या इतिहासकारांचा असा दावा आहे की, रसगुल्ला पुरीपासून बनवला गेला होता. खीर मोहनची मिठाई बनवली जात होती आणि इतिहासकार म्हणतात की, रसगुल्ला त्यापासूनच बनवला गेला. जगन्नाथ मंदिरात हा पदार्थ नैवैद्य म्हणूनही वापरला जातो. इतिहासकारांचा असा दावा आहे की, पुरी मंदिरात जवळजवळ 300 वर्षांपासून रसगुल्लाचा आनंद लुटला जात आहे. त्याचवेळी असा दावा केला जात आहे की रसगुल्ला ओडिशाच्या खानसाम्यांसमवेत बंगालमध्ये पोहोचला (Know the history of rasgulla how astronauts can bring this in space).

बंगाल दावा

त्याचबरोबर बंगालचा थेट दावा आहे की, रसगुल्ला कोलकाता येथील नोबिन चंद्र दास यांनी 1868मध्ये सुरू केला होता. असा दावा केला जात आहे की, रसगुल्ला दास यांनी बनवण्यापूर्वीदेखील बनवला गेला होता. परंतु, दास यांनी त्याला बर्‍यापैकी लोकप्रिय केले. यासोबतच ब्रजा मोरिया यांनी 1866मध्येच कलकत्ता हायकोर्टाबाहेर रसगुल्ला विक्रीस सुरुवात केली, असा दावा अन्न-इतिहासकार प्रणव रे यांनी केला आहे. त्याच वेळी, असेही म्हटले जाते की, रसगुल्लासारख्या अनेक मिठाई बंगालच्या बर्‍याच भागात इतर अनेक नावांनी प्रसिद्ध होत्या.

रसगुल्ला अवकाशातही चाखता येणार!

आता यात कुठल्याही प्रकारचे वाद होऊ शकतात. परंतु, हे खरे आहे की रसगुल्ला खूप मजेदार आहे आणि आज तो बर्‍याच देशांमध्ये पोहोचला आहे. हा पदार्थ भारतातील प्रत्येक लहान आणि मोठ्या हॉटेलमध्ये आढळते. पण लवकरच हा रसगुल्ला अवकाशातही पोहोचणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो एका अशा रसगुल्ल्यावर काम करत आहेत, जो भारतीय अंतराळवीरांना अंतराळ मोहिमेवर देखील घेऊन जाऊन त्याचा आस्वाद घेता येईल.

(Know the history of rasgulla how astronauts can bring this in space)

हेही वाचा :