मुंबई : ओवा हा घटक आपल्या स्वयंपाक घरात सामान्यत: मसाला म्हणून वापरला जातो. ओवा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हा घटक बर्याचदा अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरला जातो. पोटदुखीच्या दरम्यान, स्त्रियांसाठी मासिक पाळी दरम्यानच्या संबंधित समस्यांवर मात करण्यास ओवा मदत करतो. पण, आपण कधी ओव्याचा चहा प्यायला आहात का? चला तर, ओव्याचा चहा कसा बनवला जातो आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया…(Know the recipe and benefits of Ajwain Tea)
भूक लागण्यासाठी प्या ओव्याचा चहा : उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे अनेकदा भूक कमी होते. अशा परिस्थितीत आपण ओव्याचा चहा पिऊ शकता. यामुळे तुमची भूक वाढते. यामुळे शरीराची ऊर्जा पातळी देखील वाढते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : ओव्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ओवा चरबी कमी करण्यास देखील मदत करतो. याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.
संसर्ग प्रतिबंधित करतो : ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल अर्थात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. नियमितपणे एक कप ओव्याचा चहा प्यायल्याने आपण स्वत:ला अनेक संसर्गापासून वाचवू शकता.
संधीवातावर फायदेशीर : ओव्याच्या चहामध्ये ओमेगा आम्लाची मात्रा चांगली असते. हे शरीराची जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ओव्यचा चहा हृदयरोग आणि संधिवातवर देखील फायदेशीर आहे.
पचनासाठी चांगले : नियमितपणे सकाळी एक कप ओव्याचा चहा प्यायल्याने आपली पाचक प्रणाली निरोगी राहते (Know the recipe and benefits of Ajwain Tea).
दम्याच्या रुग्णांसाठी गुणकारी : ओव्याचा चहा दम्याच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. दररोज मध घालून ओव्याचा चहा प्यायल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
माऊथ फ्रेशनर : ओवा माऊथ फ्रेशनर प्रमाणे देखील काम करतो. तसेच दातदुखीची समस्या कमी करण्यास देखील मदत करतो.
मुताखड्यावर उपचार : ओव्यचा चहा प्यायल्याने मूतखड्याची समस्या देखील दूर होते.
ओव्याचा चहा बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 कप पाणी उकळवा. यानंतर, त्यात अर्धा चमचा ओवा घाला आणि गॅसवर मंद आचेवर उकळवा. काही वेळानंतर, तो एका कपमध्ये ओत आणि त्यात लिंबाचा रस आणि एखादा चमचा मध मिसळून प्या. याशिवाय आपण ओव्याचा चहा आणखी एका पद्धतीने बनवू शकता. यासाठी अर्धा चमचा ओवा एक ग्लास पाण्यात घालून रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून ते 5-7 मिनिटे उकळवून मग प्या.
(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
(Know the recipe and benefits of Ajwain Tea)
महामारीच्या काळात ऑक्सिजन वाढविण्यात मदत करेल ‘किवी’, अशा प्रकारे करा सेवन
पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !
नाशपती खाल्ल्याने मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या त्याचे इतर फायदे !https://t.co/KJPqggWecH #Pears | #fruits | #HealthTips | #ImmunityBoosterTips | #immunesystem | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2021