मुंबई : जर तुम्हाला मेकअपची आवड असेल, तर तुम्हाला प्रायमर विषयी माहिती असायलाच हवी. प्रायमर मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवतो, बेस बरोबरच चेहऱ्याला एक गुळगुळीत लूक देतो. परंतु, काही स्त्रियांना प्रायमर वापरल्यानंतरही इच्छित परिमाण मिळत नाही. जेव्हा आपल्याला प्रायमरबद्दल पूर्ण ज्ञान नसते, तेव्हा असे होते. प्रायमर वापरण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते जाणून घेऊया…(Know these basics application tips for makeup primer)
प्रायमर आपल्या चेहऱ्यावर मेकअपसाठी बेस तयार करतो, याच्या थराला त्वचेवर सेट होण्यास थोडा वेळ लागतो. म्हणून प्रायमर लावल्यानंतर काही काळ चेहऱ्यावर काहीही लावू नका. परंतु, बहुतेक स्त्रिया अशी चूक करतात की, त्या प्रायमरनंतर ताबडतोब चेहऱ्यावर फाउंडेशन लावतात. जर, आपण प्रायमर नंतर लगेचच फाउंडेशन लावले, तर प्रायमर लावण्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून पुढच्या वेळी प्रायमर अप्लाय करताना काही मिनिटांच्या नंतरच फाउंडेशन अप्लाय करा. या दरम्यानचा वेळ आपण आपले दागदागिने घालण्यासाठी किंवा केशरचना बनवण्यासाठी वापरू शकता.
अनेकदा आपण प्रायमरच्या निवडीमध्ये चुका करतो. आजकाल बाजारात बर्याच प्रकारचे प्रायमर विकले जातात. परंतु, माहितीअभावी बर्याच वेळा आपल्याला चुकीचा प्रायमर मिळतो, ज्यामुळे चेहऱ्याला काही फायदा होत नाही. प्रायमरची निवड त्वचेनुसार करावी. समजा आपली त्वचा कोरडी असेल, तर मॉइश्चरायझरयुक्त प्रायमर निवडले पाहिजे (Know these basics application tips for makeup primer).
खूप जास्त किंवा फार कमी प्रायमर अप्लाय केल्याने त्याचा आपल्या लूकवरही परिणाम होतो. जर आपण ते मोठ्या प्रमाणात लावले, तर त्याचा परिणाम आपल्या मेकअपवर दिसून येतो आणि जर आपण त्यास अगदी कमी प्रमाणात लावले, तर ते वापरण्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून, त्याचे अचूक प्रमाण जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसेच, अप्लाय करण्यापूर्वी ते चांगले मिक्स केले असल्याचे सुनिश्चित करा.
काही स्त्रिया केवळ चेहऱ्यावर याचा वापर करतात, परंतु पापणीला प्रायमर लावत नाही. परंतु, पुढच्या वेळी आपण प्रायमर लावाल, तेव्हा ही चूक करू नका. पापणीवर प्रायमर लावल्याने डोळ्यांच्या मेक-अप दरम्यान पापणीवरचे तेल नियंत्रित होते. त्यामुळे आय-मेकअप टिकून राहतो.
प्रायमर लावण्यापूर्वी आपण प्रथम तोंड धुवावे आणि नंतर त्यावर मॉइश्चरायझर लावावे, ते आपल्या त्वचेत नीट शोषले जाईपर्यंत थांबावे. त्यानंतरच प्रायमर लावावे. जर आपली त्वचा तेलकट असेल, तर मॅट प्रायमर वापरावा आणि जर आपली त्वचा कोरडी असेल तर जेल-बेस्ड प्राइमर आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.
(Know these basics application tips for makeup primer)
Makeup Tips | ऑफिससाठी तयार होताना जास्त वेळ लागतोय? मग, नक्की ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!#makeuplooks | #MakeupTips | #Makeup | #beautytips https://t.co/exHA9kbJ3R
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021