त्वचेवर लिंबाचा रस थेट लावणे योग्य की अयोग्य ?

| Updated on: Jul 06, 2023 | 3:05 PM

लिंबाचा रस त्वचेवर किंवा स्किनवर लावावं की नाही याचे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते. मात्र त्याचे फायदे काय, तोटे किती हे सर्व जाणून घेऊया.

त्वचेवर लिंबाचा रस थेट लावणे योग्य की अयोग्य ?
Image Credit source: freepik
Follow us on

Skin care : कपडे आणि फुटवेअर यांच्या व्यतिरिक्त आपला चेहरा हा देखील आपले सौंदर्य आणि पर्सनॅलिटी दाखवत असतो. तो निस्तेज आणि काळसर झाला तर व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर (skin problems) मात करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली अनेक (beauty products) उत्पादने वापरतो. परंतु त्यातील रसायनांमुळे त्रास होतो आणि त्यामुळेच लोक नैसर्गिक उत्पादने किंवा घरगुती उपचारांचा अधिक वापर करण्यास प्राधान्य देतात.

घरगुती उपचार अधिक उपयुक्त असतात, तसेच त्यामुळे होणारे तोटेही कमी आहेत. पण ते उपाय करताना एखादी जरी चूक झाली तर ती खूप महागात पडू शकते.

त्वचा चमकदार होण्यासाठी बऱ्याच वेळा लोक लिंबाच्या रसाचा त्वचेसाठी वापर करतात. हा एक असा घटक आहे ज्यामध्ये त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. पण लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्याने बरंच नुकसान होऊ शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळे लिंबाचा रस त्वचेवर लावणे योग्य की अयोग्य, याबाबल लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. लिंबू चेहऱ्यावर लावणे कितपत योग्य आहे आणि त्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.

एका रिपोर्टनुसार लिंबाचा रस थेट त्वचेवर लावला तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये ब्लीचिंग इफेक्ट्स आणि व्हिटॅमिन सी असले तरी ते थेट त्वचेवर लावणे खूप भारी पडू शकते. लिंबू थेट त्वचेवर लावल्याने लालसरपणा येणे, पुरळ येणे किंवा ॲलर्जी होऊ शकते. तसेच लिंबामुळे सनबर्नचा त्रास आणखी वाढू शकतो. कारण त्याच्यातील ब्लीचिंग इफेक्टमुळे त्वचा जळू शकते.

त्वचेवर असा लावा लिंबाचा रस

त्वचेवर लिंबाचा रस लावायाचा असेल तर या पदार्थांमध्ये मिसळून लावू शकता.

१) लिंबू आणि मध मिसळा आणि त्वचेवर लावा. लिंबू त्वचा स्वच्छ करेल, तर मध ते मऊ करण्यासाठी काम करेल.

२) चेहऱ्याची खोलवर स्वच्छता हवी असेल तर त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस मध दह्यात मिसळून त्वचेवर लावू शकता. तसे, दही आणि लिंबाच्या वापरामुळे केसांमधील कोंडा दूर होतो.

३) खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसापासून नैसर्गिक क्रीम बनवता येते. याने चेहऱ्याला मसाज केल्याने उन्हाळ्यात त्वचा चमकदार होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)