Lakshdweep Tourism | वॉटर स्पोर्ट्स ते अप्रतिम स्ट्रीट फूड… लक्षद्वीपची ट्रीप प्लान करण्यापूर्वी हे नक्की वाचा

| Updated on: Jan 12, 2024 | 9:24 AM

लक्षद्वीपमध्ये, तुम्ही सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्यांसह अप्रतिम स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही येथे अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही लुटू शकता. जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा प्लान आखत असाल तर त्या या आयलंडची संपूर्ण माहिती नक्की जाणून घ्या.

Lakshdweep Tourism | वॉटर स्पोर्ट्स ते अप्रतिम स्ट्रीट फूड... लक्षद्वीपची ट्रीप प्लान करण्यापूर्वी हे नक्की वाचा
Follow us on

Lakshdweep Tourism | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप बरचं चर्चेत आलं आहे. मोदींनी त्या दौऱ्याचे फोटो शेअर केल्यावर सोशल मीडियावर लक्षद्वीपही ट्रेंडमध्ये आलं आहेय अनेकांनी तिथे जायचा प्लान आखला आहे. लक्षद्वीप हा अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या बेटांचा एक समूह आहे जो त्याच्या सौंदर्यासाठी आणि खडकांसाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापासून त्याची चर्चा सुर तर झाली. पण पर्यटकांचा ओघही वाढला आहे. अनेकांनी तिथे जाण्यासाठी बूकिंग्स केली आहेत. जर तुम्हीही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या ठिकाणाची संपूर्ण माहिती नक्की घ्या. येथे तुम्ही स्वादिष्ट स्ट्रीट फूडसह उत्कृष्ट वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

सुंदर समुद्रकिनारे

लक्षद्वीपचे सुंदर किनारे हे तिथली पांढरी वाळू आणि क्रिस्टल क्लिअर, स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. येथे तुम्हाला अनेक बेटे पाहायला मिळतील जी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहेत. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण असूनही, तिकडे गर्दी फार कमी दिसते. ज्यामुळे हे किनारे आतापर्यंत स्वच्छ आणि नीटनेटके राहिले आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

वॉटर स्पोर्ट्सची मजा

ज्यांना वॉटर स्पोर्ट्सची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. शांत आणि स्वच्छ पाण्यात वॉटर स्पोर्ट्स करण्याची मजा काही औरच असते. अशा शांत पाण्यात तुम्ही विंडसर्फिंग आणि पॅडलबोर्डिंग सारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगचाही आनंद लुटू शकता.

मिनिकॉय द्वीप

मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे, कोचीच्या नैऋत्य भागात स्थित आहे. या बेटावरील सर्वात जुने दीपगृह 1885 मध्ये बांधले गेले. येथे तुम्ही टूना कॅनिंग फॅक्टरी, लाइट हाऊस, तसेच दाट नारळाच्या झाडांसह लाँग ड्राईव्ह आणि वळणदार रस्त्यांचा आनंद घेऊ शकता.

फेमस स्ट्रीट फूड

या बेटावर तुम्ही अप्रतिम स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथल्या स्थानिक जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. इथे तुम्हाला मुस कबाब, ऑक्टोपस फ्राय, फिश टिक्का, फिश पकोडा, मासू पोडीचाथ मिळेल. या मांसाहारी पदार्थांव्यतिरिक्त, तुम्हाला येथे शाकाहारी जेवणाचेही अनेक उत्तम पर्याय मिळतील ज्यात अप्पम, उत्तपम, मलबार पराठा, मेदू वडा यांचा समावेश आहे.