सर्व महिलांना नेहमी सुंदर आणि आकर्षित दिसायचे असते. सुंदर चमकदार आणि निस्तेज त्वचेसाठी अनेक महिला सतत काही ना काही प्रयोग करत असतात ज्यामुळे त्या आकर्षित दिसतील. महिलांच्या शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी काहीना काही उपाय करत असतात. शरीरावरील केस काढण्यासाठी सर्वात जास्त वॅक्सिंगचा उपयोग केला जातो. आजकाल बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या ट्रिटमेंट उपलब्ध झाल्या आहे. परंतु, या ट्रिटमेंट्समुळे तुमची त्वचा खराब होते. या रसायनिक पादार्थांचा त्वचेवर वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक महिला त्यांच्या हाता पायावरील केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जातात आणि वॅक्सिंग किंवा लेझर ट्रिटमेंट करतात. यामुळे तुमच्या शरीरावरचे केस निधून जातात. परंतु अनेकवेळा हाता पायावर वॅक्सिंग केल्यामुळे तुमची त्वचा ताणली जाते. सारखी सारखी वॅक्सिंग केल्यामुळे तुमच्या शरीरावरील त्वचा संवेशिल होते आणि कोरडी देखील होते. अनेक महिलांना वॅक्सिंग करण्याची भीती देखील वाटते. अशा वेळी अनेक महिला घरच्या घरी शरीरावरील केस काढण्याचा प्रयत्न करतात.
अनेक महिला घरच्या घरी शरीरावरील केस काढण्यासाठी अनेक रसायनिक क्रिम्सचा वापर केला जातो. परंतु या रसायनिक प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतात. वॅक्सिंग केल्यामुळे तुमच्या शरीरावरील टॅन आणि अतिरिक्त त्वचा निघून जाते. जास्त प्रमाणात वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा लाल होते. त्यासोबतच शरीरावर बारीक पुरळ आणि पिंपल्स येतात आणि अनेक समस्या उद्भवतात. चसला तर जाणून घेऊया घरच्या घरी वॅक्स कसा तयार करायचा?
साहित्य -: लिंबाचा रस, बेकिंग सोडा,गरम पाणी, गव्हाचे पीठ, टिश्यू पेपर.
सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन लिंबाचा रस घ्या. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा आणि गरम पाणी मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पिठ मिक्स करून सर्व मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण तुमच्या शरीरावर वॅक्सिंगसाठी वापरू शकता. तयार मिश्रण तुमच्या शरीरावर लावल्यामुळे त्यावरील अतिरिक्त केस निघून जातात. तयार मिश्रणाचा वापर तुम्ही चेहऱ्यावरील केस आणि टॅन काढण्यासाठी वपरू शकता. तायर मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर ३ ते ४ मिनिटे लावल्यामुळे तुमची त्वचा चमकते आणि टॅन निधून जाते.
या गोष्टी नेम्ही लक्षात ठेवा :
१) वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर साबणाचा वापर करू नका.
२) वॅक्सिंग नंतर चुकूनही गरम पाण्यानी अंघोळ करू नका.
३) शरीरावर कधीच रसायनिक पदार्थांचा वापर करू नका.
४) वॅक्सिंग केल्यावर जर पुरळ किंवा पिंपल्सच्या समस्या होत असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या.
५) वॅक्सिंग केल्यानंतर तुमच्या शरीरावर बर्फ लावल्यामुळे शरीराला फायदे होतील.