माधुरीसारखं तारुण्य टिकवायचंय?; नवरा डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं खास सिक्रेट्स

| Updated on: Jan 04, 2025 | 5:08 PM

माधुरी दीक्षित यांचे पती, दीर्घायुष्य आणि चिरतरुण राहण्यासाठी सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय सहजपणे घरीच अंमलात आणता येतात आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी मदत करतात.

माधुरीसारखं तारुण्य टिकवायचंय?; नवरा डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं खास सिक्रेट्स
Madhuri Dixit husband
Follow us on

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे तज्ज्ञ डॉक्टर असल्याने ते निरोगी कसे राहाल, तुमची तब्ब्येत कशी सांभाळाल याच्या काही टीप्स देत असतात. नुकतंच डॉ. श्रीराम नेने यांनी निरोगी आयुष्य कसे जगायचे आणि दीर्घकाळ चिरतरुण कसे राहायचे याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. तुम्ही घरच्या घरी हे उपाय करु शकता.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी सोशल मीडियाद्वारे विविध आरोग्यदायी टीप्स लोकांना देत असतात. नुकतंच त्यांनी दीर्घायुष्य आणि चिरतरुण राहण्यासाठीच्या काही खास टीप्स शेअर केल्या आहेत. जे अगदी सहजपणे फॉलो केले जाऊ शकते.

संतुलित आहार

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, दररोज आरोग्यदायी पदार्थ खा. यामुळे वृद्धत्व दूर होण्यास फायदा मिळेल. तसेच तुमच्या शरीराला योग्य ती पोषक तत्त्वही मिळतील. ज्याचा फायदा आपोआपच तुम्हाला होईल.

व्यायाम

दररोज व्यायाम केल्याने तुमचे शरीर सुदृढ बनते. तसेच व्यायाम, योगा यामुळे तुमचे आयुष्यही वाढण्यास मदत होते. व्यायाम केल्याने तुमच्या त्वचेलाही त्याचा फायदा होतो. तुमच्या चेहऱ्यावर वयोमानाने दिसणार वृद्धत्व दिसत नाही.

धूम्रपान सोडा

धूम्रपान हे शरीरासाठी घातक असते, असे वारंवार सांगितले जाते. तरीही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आता डॉ. श्रीराम नेने यांनीही धूम्रपानाच्या घातक परिणाम तुमच्या शरीरावर जाणवतात, याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे तुमची त्वचा चिरतरुण ठेवण्यासाठी आणि सुरकुत्या टाळण्यासाठी धूम्रपान सोडा. यामुळे तुम्हाला फायदा होईल.

मद्यपान टाळा

यकृत निरोगी ठेवण्यासाठी मद्यपान टाळावे. तसेच मद्यपान टाळल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात अल्कोहोलचे प्रमाण कमी झाल्याने आपोआपच तुमची तब्येत सुधारते आणि त्यामुळे तुम्ही चिरतरुण दिसू शकता.

त्वचेची काळजी घ्या

आपण अनेकदा बाहेरुन आल्यानंतर हात-पाय धुवावे, असा सल्ला इतरांना देतो. पण हात-पाय स्वच्छ करण्यासोबतच तोंडावरही पाणी मारले, तोंड स्वच्छ साबण किंवा फेशवॉसने धुतले तर तुम्हालाही फ्रेश वाटते. तसेच बाहेर फिरतेवेळी सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेला चमक येते.

तणाव टाळा

दैनंदिन जीवनात कामाचा ताण घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्व दिसू लागते. ताणतणाव कमी केल्यास आयुष्य देखील वाढते. तसेच त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत होते.