मुंबई : माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावेळी माघ पौर्णिमा 27 फेब्रुवारीला येत आहे. असे मानले जाते की, या महिन्यात पवित्र नदीत स्नान करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात. माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसाला ‘माघी पौर्णिमा’ देखील म्हटले जाते. बरेच लोक या दिवशी विशेष व्रत ठेवतात. या दिवशी दान-पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे (Magh Purnima 2021 remedies for prosperity).
माघ पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र माघ नक्षत्र आणि सिंह राशिमध्ये आहे, म्हणून त्याला ‘माघमास’ देखील म्हणतात. बरेच लोक माघ महिन्यात ‘कल्पवास’ करतात. यावेळी लोक उपवास करतात आणि दररोज सरयू नदीच्या काठावर स्नान करतात. या दिवशी विशेष उपाय केल्यास त्या व्यक्तीला धन संपत्ती आणि कीर्ती मिळते, असे म्हणतात. चला तर, त्या उपायांबद्दल आपण जाणून घेऊया…
पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची उपासना केल्याने घरात धन आणि कीर्ती वाढते. या दिवशी आंघोळ केल्यावर तुळशीच्या झाडाला नैवेद्य, दिवा आणि पाणी अर्पण करावे. याशिवाय दिवसभर माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा.
माघ पौर्णिमेच्या दिवशी मनःशांतीसाठी चंद्रोदयांची पूजा करावी. नंतर कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून त्याची खीर बनवावी. ‘ॐ स्रां स्रीं स्रौं स: चन्द्रमसे नम:’, ‘ ॐ ऐं क्लीं सोमाय नम:’ किंवा ‘ओम स्मेल सोमय नमः’ या मंत्रांचा जप करताना चंद्राला अर्घ्य अर्पण करावे (Magh Purnima 2021 remedies for prosperity).
जर तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे असेल, तर मग माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. यानंतर, चंद्रोदय झाल्यानंतर त्या दिवशी पती-पत्नीने चंद्राला कच्चे दूध अर्पण करावे.
असे मानले जाते की, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते. या दिवशी सकाळी आंघोळ करुन पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करावे, याने समृद्धी प्राप्त होते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून गरीब लोकांना दान करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, पवित्र नदीत माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने त्या व्यक्तीची सर्व पापं नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. या दिवशी, भगवान विष्णूची पूजा संपूर्ण विधिवत पद्धतीसह केली जाते. त्याच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो.
(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)
(Magh Purnima 2021 remedies for prosperity)
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मिळते शनि पीडेतून मुक्तता! वाचा या मागची पौराणिक कथा!
Jaya Ekadashi 2021 | पुण्यदायी ‘जया एकादशी’ व्रत, जाणून घ्या याची कथा आणि मुहूर्त#JayaEkadashi2021 | #JayaEkadashi | #devotional | #Poojahttps://t.co/ULlWKFAN0A
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021