Magh Purnima 2021 | माघ पौर्णिमेचे पवित्र व्रत, जाणून घ्या व्रत विधी आणि शुभ मुहूर्त…

| Updated on: Feb 26, 2021 | 8:47 AM

हिंदू धर्मशास्त्रात पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शुक्ल पक्ष महिन्याच्या शेवटच्या तारखेला माघ पौर्णिमा तिथी येते. या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण कलेत असतो (Magh Purnima 2021 special).

Magh Purnima 2021 | माघ पौर्णिमेचे पवित्र व्रत, जाणून घ्या व्रत विधी आणि शुभ मुहूर्त...
माघ पौर्णिमा
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मशास्त्रात पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शुक्ल पक्ष महिन्याच्या शेवटच्या तारखेला माघ पौर्णिमा तिथी येते. या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण कलेत असतो. पौर्णिमेच्या दिवशी दान व स्नानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी काही लोक उपवास ठेवतात आणि चंद्रांला अर्घ्य अर्पण करतात (Magh Purnima 2021 special muhurat and pooja story).

लवकरच माघ महिन्याची पौर्णिमा येत आहे. पण पौर्णिमा दोन दिवस असल्याने लोकांमध्ये खूप संभ्रम निर्माण झाला आहे. आपणही अशा संभ्रमात असल्यास, चिंता करू नका. चला जाणून घेऊया, माघ पौर्णिमा संबंधित महत्वाची माहिती…

‘या’ दिवशी करा ‘व्रत’

पौर्णिमा तिथी शुक्रवारी 26 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 03 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी 2021 रोजी ते 01 वाजून 46 मिनिटांपर्यंत सुरू राहतील. तिथीनुसार पौर्णिमेची तारीख 27 फेब्रुवारी रोजी असेल. अशा परिस्थितीत, 27 फेब्रुवारी दान आणि स्नानासाठी चांगला असेल. आपण या दिवशी उपवास ठेवणार असाल तर, चंद्राला अर्घ्य अर्पण करणार असणार असाल तर, 26 फेब्रुवारी रोजी उपवास ठेवा कारण पौर्णिमा चंद्र केवळ 26 फेब्रुवारीलाच दिसेल.

पौर्णिमेचे महत्त्व

पौर्णिमेची तिथी चंद्रदेव आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे. दान व स्नान याशिवाय लोक सत्यनारायणाची कथा देखील ऐकतात. असे मानले जाते की, असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही, समृद्धी येते आणि नि:संतान जोडप्यांना पुत्र प्राप्ती होईल. पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून आणि दान केल्याने, भगवान नारायण प्रसन्न होतात आणि भाविकांना सर्व संकटांपासून वाचवतात, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात (Magh Purnima 2021 special muhurat and pooja story).

माघ पौर्णिमेची कथा

धनेश्वर नावाचा ब्राह्मण कांतिक नगरात रहात होता. त्याने आपले जीवन दानधर्मात व्यतीत केले. ब्राह्मण व त्यांची पत्नी यांना मूलबाळ नव्हते. एकेदिवशी त्याची बायको शहरात भिक्षा मागण्यासाठी गेली, पण सर्वांनी तिला वांझ असल्याचे सांगून भीक देण्यास नकार दिला. मग, एखाद्याने तिला 16 दिवस आई कालीची पूजा करण्यास सांगितले, तिच्या म्हणण्यानुसार, ब्राह्मण दांपत्यानेही तसे व्रत केले. त्यांच्या पूजेमुळे माता संतुष्ट झाले, आई काली 16 दिवसांनी हजर झाली आणि आई कालीने ब्राह्मणच्या पत्नीला गर्भवती होण्यासाठी वरदान दिले. तसेच, सांगितले की आपल्या क्षमतेनुसार आपण प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. अशाप्रकारे, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत कमीतकमी 32 दिवे होईपर्यंत दिवा लावावा.

ब्राह्मणांनी पूजेसाठी झाडावरुन आंब्याचे कच्चे फळ तोडले. त्याच्या पत्नीने उपासना केली आणि परिणामी ती गरोदर राहिली. प्रत्येक पौर्णिमेला आई कालीने सांगितल्यानुसार, तिने दिवे प्रज्वलित केले. आई कालीच्या कृपेने त्यांच्या घरी देवदास नावाचा मुलगा जन्माला आला. देवदास मोठा झाल्यावर त्याला काशीला, त्याच्या मामाकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. काशी येथे एका अपघाताने देवदासाचे लग्न फसव्या पद्धतीने लावून दिले गेले. देवदास म्हणाला की, तो अल्पायु आहे. पण, तरीही त्याचे जबरदस्तीने लग्न लावले गेले आहे. काही काळानंतर यमदेव त्याचा प्राण घेण्यास आले. परंतु, ब्राह्मण दांपत्याने त्यादिवशी पौर्णिमेचे व्रत ठेवले होते. म्हणून काल त्याचे काहीच वाईट करू शकला नाही. तेव्हापासून असे म्हणतात की, पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने एखाद्याला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Magh Purnima 2021 special muhurat and pooja story)

हेही वाचा :

पूजा-पाठ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, घरात नांदेल सुख-समृद्धी!

Vastu Tips | चुकूनही ‘या’ दिशेला डोके करून झोपू नका, जाणून घ्या झोपण्याच्या योग्य पद्धती…