ख्रिसमस आलाय… वाट कसली बघता, घरच्या घरीच बनवा असा टेस्टी केक

| Updated on: Jan 02, 2025 | 4:24 PM

ख्रिसमस 2024 साठी घरच्या घरी बनवण्यासाठी सोपी आणि स्वादिष्ट रेड व्हेल्वेट केकची रेसिपी या लेखात दिली आहे. सविस्तर साहित्य आणि तयारी पद्धती सोप्या भाषेत स्पष्ट केली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कपकेक किंवा मोठे केक बनवू शकता आणि क्रिसमसच्या सणाला एक वेगळाच आनंद देऊ शकता.

ख्रिसमस आलाय... वाट कसली बघता, घरच्या घरीच बनवा असा टेस्टी केक
Follow us on

ख्रिसमस ( Christmas 2024 ) म्हटला की सर्वात आधी आठवतो तो केक. या काळात विविध प्रकारचे केक खायला मिळतात. शिवाय या काळात अनेक महिला विविध प्रकारचे चविष्ट केक बनवत असतात. त्यामुळे प्रत्येक घरात केकची जणू पर्वणीच असते. काही घरात तर केक बनवण्याची जणू स्पर्धात असते, एवढे प्रयोग केले जातात. दुकानातही केकची रेलचेल असतेच असते. अशावेळी कोणता केक घ्यावा? तो चांगला होईल का… अशा विविध शंका मनात येत असतात. त्यामुळे, या ख्रिसमसला घरच्या घरी आनंदाने साजरा करण्यासाठी, आपण स्वत:चा केक तयार केला तर?

आज आपण एक सोप्या पद्धतीने तयार होणारा ‘रेड व्हेल्वेट’ केक रेसिपी सांगणार आहोत. तर, आधी पाहूया त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

आवश्यक साहित्य:

मैदा – 120 ग्रॅम

हे सुद्धा वाचा

पावडर साखर / कास्टर साखर – 150 ग्रॅम

बटर – 55 ग्रॅम

अंडी – 2

कोको पावडर – 1 टेबल स्पून

सायडर व्हिनेगर – ½ टीस्पून

बेकिंग सोडा – ½ टीस्पून

दही – 100 ग्रॅम

लाल रंग – आवडीनुसार (½ टेबल स्पून पुरेसा)

व्हॅनिला एसेन्स – ½ टीस्पून

केक तयार करण्याची पद्धत :

एका बाऊलमध्ये कास्टर साखर आणि बटर एकत्र करून चांगलं फेटून घ्या. त्यानंतर त्यात अंडी फोडून, त्यांना चांगलं फेटून एकत्र करा. नंतर, मैद्यामध्ये 1 टिस्पून कोको पावडर घालून 3 वेळा चाळून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात दही घालून चांगलं मिसळून घ्या. कधी कधी मिश्रण थोडं फाटलेलं दिसू शकतं, पण काळजी करू नका. त्यानंतर लाल रंग (½ टेबल स्पून) घालून मिसळा. त्यात व्हॅनिला एसेन्स सुद्धा घालून मिक्स करा.

एका वेगळ्या बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि सायडर व्हिनेगर मिक्स करून त्यात टाका. नंतर ते मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून फेटा. पण खूप जास्त फेटू नका. आता तुमचं केक तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे. याच मिश्रणाचा वापर करून कप केकसुद्धा तयार करू शकता किंवा 450-500 ग्राम वजनाचं सिंगल केक बनवू शकता.

केक तयार झाल्यावर, त्यावर तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकता. ख्रिसमस असल्यामुळे पांढऱ्या आणि लाल रंगाच्या सजावटीचा वापर करणं उत्तम ठरेल. बटर आइसिंग फ्लेवर किंवा इतर सजावट साहित्य यासाठी वापरता येईल.