ख्रिसमसला बनवा ‘हे’ टेस्टी 4 हेल्दी ड्रिंक्स, मिळतील बरेच फायदे

| Updated on: Dec 25, 2024 | 3:55 PM

हिवाळ्यात आपण सगळेच स्वत:ची काळजी घेत असतो. त्यात आता मित्र-मैत्रिणींसोबत ख्रिसमस सणाचा आनंद लुटण्याची वेगळीच मजा येते. तुम्हीही यावेळी ख्रिसमस पार्टी करत असाल तर या 4 ड्रिंक्सचा तुमच्या मेन्यूमध्ये नक्की समावेश करा. ते केवळ चवदारच नाहीत तर आरोग्यासाठी देखील बरेच फायदे आहेत.

ख्रिसमसला बनवा हे टेस्टी 4 हेल्दी ड्रिंक्स, मिळतील बरेच फायदे
Follow us on

ख्रिसमसच्या दिवशी काही लोकं आपापल्या घरी पार्ट्या आयोजित करतात, ज्यात ते सर्व मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना आमंत्रित करतात. अशा वेळी तुम्ही पार्टीसाठी लागणारे सर्व पदार्थ तयार करून ठेवतात. त्यातच अनेकदा असे होते की ड्रिंक्समध्ये काय ठेवावे असा प्रश्न पडतो. अश्यातच जर एखादे ड्रिंक्स चवदार आणि हेल्दी कसे बनवू शकतो ज्याने आलेल्या पाहुण्यांसाठी आरोग्यदायीही असेल. याबद्दल लोकं बऱ्याचदा द्विधा मनःस्थितीत असतात. जर तुम्हीही ख्रिसमसला पार्टी होस्ट करत असाल आणि मेन्यूमध्ये कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करावा हे तुम्हाला समजत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे तुम्ही त्या पेयांविषयी जाणून घेऊ शकता, जे चवदार तर असतीलच पण आरोग्यदायीही असतील.

ही हेल्दी ड्रिंक्स विशेषतः हिवाळ्याच्या हंगामासाठी असतात. कारण हिवाळयात ख्रिसमस हा सण येतो त्यामुळे बाहेरील वातावरणात खूप थंडी पडते. त्यामुळे स्वत:ला आतून उबदार ठेवणं खूप गरजेचं आहे. अशावेळी या ड्रिंक्सचे सेवन करून स्वतःला आनंदी आणि फिट ठेऊ शकता.

काश्मिरी कहवा

थंड हवामानात शरीराला आतून उबदारपणा देण्यासाठी काश्मिरी कहवापेक्षा चांगले काहीच नाही. हे ड्रिंक्स ग्रीन टीची पाने, चहा मसाले, नटस आणि केशरपासून बनविलेले जाते आणि या काश्मिरी कहवा मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे आवश्यक पोषक घटक मिळतात जे आरोग्यास खूप चांगले फायदेशीर ठरतात. हे पेय तयार करण्यासाठी वापरले जाणारे मसाले तुम्हाला गॅस, जळजळ आणि अपचन या समस्यांपासून दूर ठेवतात.

काश्मिरी कहवाची खास गोष्ट म्हणजे या ड्रिंक्समध्ये असलेले बदाम प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहे. याव्यतिरिक्त, हे पोषक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास, कोलेस्ट्रॉलशी लढण्यास आणि तुमचे हृदय आणि मन निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मेनूमध्ये लिंबू आणि आल्याचा चहाचा करा समावेश

थंडीच्या दिवसात चहा आणि कॉफीचे सेवन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. कारण या ऋतूत थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम गरम पदार्थ पिणे खूप आनंददायक असते. मात्र, चहा-कॉफीचे जास्त सेवन करणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. अशावेळी तुम्ही पार्टीत कॉफी आणि चहाऐवजी लिंबू आणि आल्याच्या चहाचा समावेश करू शकता. हा चहा केवळ चवीलाच उत्तम नाही तर आरोग्यासाठी ही अनेक फायदे प्रदान करतो.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि हिवाळ्यातील सामान्य आजारांशी लढण्यास मदत करते. त्याच वेळी, आल्याचा उपयोग बऱ्याचदा सर्दी आणि जळजळ यावर उपचार म्हणून केला जातो.

दालचिनी बदाम स्मूदी देखील चांगला पर्याय 

बदामाचे दूध, केळी आणि थोडी दालचिनी यांचे मिश्रण तुम्हाला चवदार स्मूदी बनविण्यात मदत करू शकते. या ड्रिंक्सचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. बदाम कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, तर केळीमध्ये पोटॅशियम असते, जे एक चवदार ड्रिंक तयार करते आणि याच्या सेवनाने आरोग्याला बरेच फायदे होतात.

संत्री आणि केळीचे स्मूदी देखील चवदार असते

संत्री आणि केळी पासून तयार केलेली स्मूदी केवळ चविष्ट नसून, ती आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, जे कोलेजन संश्लेषणासाठी खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर केळीबद्दल बोलायचे झाले तर यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या हाडांना मजबूत करण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)