नवी दिल्ली : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून रंग खेळण्यास (holi colors) बरेच जण उत्सुक आहेत. देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक हा सण नाचून, गाऊन, एकमेकांना रंग लावून आणि चविष्ट पदार्थ खाऊन साजरा करतात. पण रंग खेळताना बरेच जण केमिकलयुक्त रंगांचा (chemical colors) वापर करताना दिसतात. मात्र या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. हे रंग त्वचेच्या छिद्रांमधून आत जाऊन शरीराचे (side effects of colors) अपरिमित नुकसान करू (skin damage) शकतात. तसेच त्वचेला, केसांना लागलेला केमिकलयुक्त रंग काढणे अतिशय त्रासदायक ठरू शकते. ते रंग काढण्याच्या प्रक्रियेत अनेक वेळा त्वचेवर पुरळ उठतात, खाज सुटू शकते.
अशा वेळी होळी खेळण्यापूर्वी आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन तयारी करा, ज्यामुळे रंगाचा त्रास होणार नाही. त्यासाठी कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.
मॉयश्चरायजर
होळी खेळण्यापूर्वी त्वचेसाठी मॉयश्चरायजर वापरा. तुम्ही नियमितपणेही मॉयश्चरायजर वापरू शकता. खोबरेल तेल, बदाम तेल आणि तिळाचे तेल देखील चेहरा आणि शरीरासाठी मॉयश्चरायजर म्हणून वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल.
सनस्क्रीन
आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे रंगापासून त्वचेला हानी पोहोचू शकते. म्हणूनच त्वचेसाठी सनस्क्रीन अवश्य वापरावे. रासायनिक रंग आणि हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. होळीच्या काही दिवस आधी त्वचेसाठी स्क्रब वापरणे टाळा.
लिप केअर
होळीचे रंग चेहऱ्यावरही लावले जातात. अशा वेळी डोळ्यांची तसचे ओठांचीही काळजी घेणे महत्वाचे ठरते. डोळ्यांवर गॉगल लावा तसेच ओठांसाठी लिप बाम नक्की वापरा. त्वचेसाठी लिप बाम वापरल्याने रंग ओठांमध्ये जाण्यापासून बचाव होतो.
आईस क्युब्स
होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आईस क्युब्स म्हणजेच बर्फाचे तुकडे वापरू शकता. हे आईस क्युब्स 10 मिनिटे चेहऱ्यावर फिरवून घ्या. त्यामुळे हत्वचेची छिद्रं बंद होतात व त्यामुळे रंग त्वचेत जात नाही. व त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
हायड्रेटेड रहावे
होळीचे रंग खेळताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी पाणी प्यायले पाहिजे. अथवा ज्यूसचे सेवन करा. याच्या मदतीने तुम्ही उष्णतेचा प्रादुर्भाव टाळू शकता.
पूर्ण कपडे घाला
होळीसाठी फुल स्लीव्ह टॉप, कुर्ता आणि पँट घाला. असे कपडे तुम्हाला रंगांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतील. डोळ्यांसाठी गॉगल अथवा सनग्लासेस वापरण्याची खात्री करा. ते आपल्या डोळ्यांना हानिकारक रंगांच्या हानीपासून वाचवतात. तसेच डोक्यालाही भरपूर तेल लावा.