भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारच्या विक्रीत आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी सर्वात पुढे आहे. त्यातच आता अनेकजण 7 सीटर कार खरेदीला जास्त पसंती देत आहे. त्यामुळे बाजारात या कारचे डिमांड सर्वाधिक वाढले आहे. 7 सीटर कार सेगमेंटमध्ये Maruti Ertiga ची लोकप्रियता अतुलनीय आहे. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या कारने नवा विक्रम केला असून WagonR आणि Baleno सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना मागे टाकत ही कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरलीय. . त्यामुळे मारुती सुझुकी इंडिया आणखी एक 7 सीटर कार लाँच करणार आहे. अलीकडे या कारची चाचणी रस्त्यांवर होताना दिसून आली आहे.
मारुती सुझुकी त्यांच्या 7 सीटर एसयूव्ही Maruti Grand Vitara (7-Seater) ची चाचणी करत आहे. याचे डिझाइन त्याच्या आगामी पहिल्या इलेक्ट्रिक कार eVitaraला प्रेरित असल्याचे आढळले आहे.
या कारच्या टेस्टिंगचे अनेक स्पाय फोटो समोर आले आहेत. ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, या कारचे कंफ्लेज्ड व्हर्जन रस्त्यावर दिसले आहे. कदाचित कंपनी या कारची ऑन-रोड टेस्टिंग करत आहे. मारुतीच्या एसयूव्ही पोर्टफोलिओमध्ये ही नवी एन्ट्री असणार आहे. सध्या कंपनीकडे Fronx, Brezza, Jimny आणि Grand Vitara सारख्या एसयूव्ही आहेत. अर्टिगा आणि एक्सएल 6 7 सीटर एमपीव्ही आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँड विटारामध्ये सध्याच्या कारप्रमाणेच 1.5 लीटर पेट्रोल किंवा हायब्रिड पेट्रोल इंजिन असू शकते. यामध्ये हायब्रीड इंजिन कारला एक्स्ट्रा बूस्ट देण्याचे काम करेल. मात्र, त्याचा व्हीलबेस लांब असेल जेणेकरून तिसऱ्या रांगेतील सीटचा समावेश करता येईल.
त्याचबरोबर बूट स्पेस मेंटेन करण्यासाठी कंपनी कारच्या इंजिनमध्ये बदल करू शकते. तर नवीन 7 सीटर ग्रँड विटारामध्ये व्हर्टिकल टच स्क्रीन आणि एडीएएस सूट देखील मिळण्याची शक्यता आहे. ही कार अर्टिगा एसयूव्हीच्या श्रेणीत येत नसल्याने बाजारात ती थेट Hyundai Alcazar, Mahindra Scorpio N आणि MG Hector Plus ला टक्कर देऊ शकते. मारुती सुझुकी ग्रँड विटारा, Maruti Suzuki eVitara आधारित त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.