Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

| Updated on: Jan 02, 2021 | 7:21 PM

आपण देखील त्वचेच्या उपचारांसाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा विचार करत आहात. तर, मसूरचा फेस पॅक नक्की ट्राय करू शकता.

Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे...
Follow us on

मुंबई : आपण त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. कधीकधी कॉस्मेटिक उत्पादने किंवा घरगुती उपचारही करून पाहतो. काही लोक यासाठी ब्युटी पार्लरचा आधार घेतात. परंतु, कोरोनामुळे सगळ्याच सेवा ठप्प झाल्याने लोक घरातच अडकून पडले होते. याकाळात बरेच लोक घरगुती उपचार करून पाहत आहेत. आपण देखील त्वचेच्या उपचारांसाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा विचार करत आहात. तर, मसूरचा फेस पॅक नक्की ट्राय करू शकता (Masoor Dal Face Pack for skin care).

मसूरची डाळ आपल्या आहारात नेहमीच वापरली जाते. परंतु, स्किनकेअरमध्येही मसूर डाळीचा उपयोग होतो. मसूरच्या डाळीत अँटीऑक्सिडेंट असतात, जे मृत त्वचेला सतेज करण्यास मदत करतात. या डाळीत पुष्कळ प्रकारचे पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या त्वचेमध्ये उपस्थित कोलेजेनला चालना देतात.

मसूर डाळ त्वचेवर एका क्लीन्सरप्रमाणे काम करते. यासह मुरुमांच्या समस्येतूनही मुक्ती मिळते. मसूर डाळ एक नैसर्गिक एक्सफोलिएटर प्रमाणे कार्य करते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होण्यास देखील मदत होते. मसूर डाळीचा फेस पॅक बनवण्यासाठी आधी या डाळीची पावडर करून ठेवा.

मसूर आणि दुधाचा फेसपॅक

डाळीची पूड आणि दुध एकत्र करून त्यांची पेस्ट बनवा. हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. जलद उपायासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक वापरा (Masoor Dal Face Pack for skin care).

गुलाब पाणी आणि दुधाचा फेस पॅक

जर, तुमची त्वचा कोरडी असेल, तर मसूर डाळीची पूड, गुलाब पाणी आणि दूध रात्रभर भिजवून ठेवून, सकाळी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट जवळपास 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. हा फेस पॅक वापरल्याने तुमची त्वचा चमकदार बनेल.

मध आणि मसूर फेस पॅक

मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करतो. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मध आणि मसूर डाळ यांची पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा. मधाचा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या टॅनिंगची समस्या दूर होईल.

मसूर, चंदन आणि संत्र्याचे फेस पॅक

दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.

(Masoor Dal Face Pack for skin care)

हेही वाचा :