हिवाळा ऋतू सुरु झाला की थंडावा जाणवू लागतो. पण त्याचबरोबर या दिवसात लहान बाळाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांच्या त्वचेला ओलावा असणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर थंडीपासून त्यांची त्वचा आणि स्नायूंचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे. नवजात बाळाच्या व लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी मसाज हा एक पारंपारिक आणि प्रभावी मार्ग आहे. मालिशमुळे बाळाला आराम मिळतो, हाडे मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात बाळाला मसाज करण्यासाठी योग्य तेलाची निवड करणे देखील खूप महत्वाचे आहे.
प्रत्येक तेलात असे काही गुणधर्म असतात जे बाळाची त्वचा आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरू शकतात. योग्य तेलाचा वापर केल्याने बाळाचे थंडीपासून संरक्षण होते, त्वचा मऊ होते आणि त्यांच्या शारीरिक वाढीस देखील मदत होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला सर्वोत्तम तेलांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या बाळाला मसाज करण्यासाठी योग्य आहेत. तसेच हे तेल बाळाच्या स्नायूंना कसे मजबूत करते आणि त्यांच्या त्वचेचे पोषण कसे करते हे आपल्याला माहित असेल.
1. नारळ तेल
नारळाचे तेल अतिशय हलके आणि त्वचेच्या आत सहज शोषले जाते. या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करतात. त्यामुळे या तेलाच्या वापराने थंडीच्या दिवसात त्वचेला ओलावा मिळतो.
2. मोहरीचे तेल
थंड हवामानात उष्णता देण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम मानले जाते. यामुळे तुमच्या लहान बाळाच्या अंगाची मसाज या तेलाने करा. कारण या तेलाच्या मसाज केल्याने स्नायू बळकट होतात आणि बाळाच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी हा एक पारंपारिक आणि लोकप्रिय पर्याय आहे.
3. बदाम तेल
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे बाळाच्या त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि पोषण देते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते तसेच हाडांच्या वाढीस मदत होते. हे त्वचेसाठी हलके आणि पूर्णपणे सुरक्षित आहे.
4. ऑलिव ऑयल
ऑलिव्ह ऑईल त्वचेत खोलवर जाऊन पोषण करते. यामुळे त्वचा मऊ होते आणि हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. हे तेल स्नायूंची ताकद आणि हाडांच्या वाढीस मदत करते.
5. एरंडेल तेल
हाडे आणि स्नायूंच्या वाढीसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून संरक्षण करतात. नवजात बाळासाठी एरंडेल तेलाचा मसाज खूप फायदेशीर ठरतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)