मुंबई : पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पपई खाताना तुम्ही ज्या बिया कचरा म्हणून टाकत होतात, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर, जाणून घेऊया पपईच्या बियांचे फायदे. ज्याचा वापर करून तुम्हालाही तुमच्या काही समस्या सोडवता येतील (Medicinal properties Of Papaya Seeds).
बर्याच संशोधनातून असे दिसून आले आहे की, पपईबरोबरच पपईच्या बियांमध्येही असे अनेक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पपई प्रमाणेच पपईच्या बिया पोटासाठी खूप फायदेशीर असतात. आपल्याला पचनासंबंधित समस्या असल्यास, या बियांद्वारे आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता. पपईच्या बिया आपल्या शरीरात उपस्थित बॅक्टेरिया आणि बरेच हानिकारक जंतू आतड्यांमधून काढून टाकतात.
– पपईचे बियाणे पॉलिफेनोल्स आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अँटीऑक्सिडेंट समृद्ध घटक असतात. ते संक्रमण आणि सर्दी आणि खोकला यासारख्या अनेक जुनाट आजारांपासून शरीराचा बचाव करण्यात मदत करतात.
– या बियांमध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म आहेत, जे आपल्या पचन क्रियेस सुरळीत करण्यास मदत करतात आणि अन्न विषबाधा टाळतात. याव्यतिरिक्त, पपईमध्ये प्रोटीओलाइटिक एंझाइम्स असतात जे आतड्यांमधील जिवाणू नष्ट करतात.
– पपई बिया लिव्हर सिरोसीस आणि यकृत संबंधित इतर समस्यांमध्ये अतिशय फायदेशीर मानले जातात. यासाठी या बिया बारीक वाटून घ्या आणि त्याचा रस काढल्यानंतर त्यात लिंबू पिळून ते प्या.
– जर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सूज येत असेल, तर पपईच्या बियांच्या सहाय्याने ती बरी होऊ शकते. वास्तविक पपईत अँटी-बॅक्टीरियल गुणधर्मांशिवाय अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. रोज एक चमचा पपई बियाणे सेवन केल्यास मोठा आराम मिळतो.
– जर तुम्हाला पीरियड्सच्या वेदनांनी त्रास होत असेल, तर पपईच्या बियांमुळे बराच आराम मिळतो. पपईचे दाणे स्नायू दुखी आणि वेदना कमी करण्यास उपयुक्त आहेत (Medicinal properties Of Papaya Seeds).
– पपईच्या बियाण्यामुळे कोलेस्टेरॉल व बीपी नियंत्रित होतो. ज्याद्वारे हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवता येते.
– या बिया तापाशी लढाण्यास देखील उपयुक्त ठरतात. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात, जे वारंवार पसरणार्या बॅक्टेरियांपासून शरीराचे संरक्षण करतात.
पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात. पपईच्या बिया थेट चावून खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही पपईच्या बियांसोबत मध किंवा गुळ देखील खाऊ शकता.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
(Medicinal properties Of Papaya Seeds)
Tea Benefits | आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरू शकतो चहा, फक्त त्यात मिसळा ‘हा’ घटक!
सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे, थायरॉईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी
Calcium Side Effects | आवश्यकतेपेक्षा जास्त कॅल्शियमचे सेवन ठरेल आरोग्यासाठी नुकसानदायी! जाणून घ्या याविषयी… https://t.co/Tk48DyKXgm #Calcium | #Health | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021