Sleeping Hacks : 2 मिनिटांत गाढ झोपायचं असेल तर ही ट्रिक करा फॉलो..

| Updated on: Jun 10, 2023 | 4:33 PM

सर्व प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नाही, अशी काही लोक नेहमी तक्रार करतात. काही उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला दोन मिनिटांत झोप येईल.

Sleeping Hacks : 2 मिनिटांत गाढ झोपायचं असेल तर ही ट्रिक करा फॉलो..
दुपारी झोपल्याने हृदय निरोगी राहते. हृदयाचे ठोके काही प्रमाणात मंदावतात, यामुळे हृदयविकार टाळता येवू शकतो. जर तुम्ही दुपारी एक तास झोप घेतली तर, याचा फायदा तुमच्या कामात दिसून येतो. यामुळे तुमची कामगिरी सुधारते.
Follow us on

Sleeping Hacks : बेडवर पडल्यानंतर तुम्हीसुद्धा सतत या कुशीवरून त्या कुशीवर वळत असता का ? ही अनेकांची तक्रार असते. बराच वेळ आडवं पडूनही लोकांना झोप (Sleep problem) येत नाही. पण एका तंत्राचा अवलंब करून तुम्ही कुठेही, फक्त दोन मिनिटांत सहज झोपू शकता. असे मानले जाते की अमेरिकन आर्मी देखील झोपण्यासाठी हे तंत्र अवलंबते.

त्याचा सतत सराव केल्याने तुम्ही फक्त दोन मिनिटांत झोपू शकता. लॉयड बड विंटर यांच्या ‘रिलॅक्स अँड विन : चॅम्पियनशिप परफॉर्मन्स’ या पुस्तकात या तंत्राचे प्रथम वर्णन करण्यात आले आहे. हे पुस्तक 1981 मध्ये प्रकाशित झाले. ज्यानंतर 1.7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले फिटनेस कोच जस्टिन अगस्टिन यांनी याच्याशी संबंधित एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ 7.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे

जाणून घ्या हे टेक्निक

सर्व प्रथम, आपले शरीर शांत करावे. यानंतर, नीट रिलॅक्स व्हा. आता तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हळूहळू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कपाळाच्या स्नायूंना आराम देऊन या तंत्राचा सराव करा. तुमचे डोळे, गाल आणि जबडा यांना आराम देताना तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खांदे शक्य तितके खाली घ्या. आपले हात आणि बोटे सैल ठेवा.

दीर्घ श्वास घेणे सुरू करा. यासोबतच छाती, पोट आणि पाय आरामात ठेवा. पण हे करत असताना तुम्हाला तुमच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण ठेवण्याची गरज नाही. या तंत्राचा सराव करताना, तुम्ही स्वच्छ पाण्याचे शांत सरोवर किंवा तुम्ही स्वत: अंधाऱ्या खोलीत मखमली झुल्यावर झोपले आहात, अशी कल्पना करू शकता.

दोन मिनिटांत लागेल झोप

अगस्टिन सांगतात की, जर तुम्ही हा सराव रोज 6 आठवडे केलात तर तुम्हाला फक्त दोन मिनिटांत झोप येईल. मात्र, हे खरेच काम करते की नाही, यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण रात्री झोपताना हे एक चांगले मेडिटेशन आहे.