जगभरातील प्रसिद्ध आणि सर्वात महागडे ‘मशरूम’, खरेदी करण्यासाठी लागतील लाखो रुपये!

| Updated on: Jan 18, 2021 | 6:23 PM

मशरूम ही एक गोष्ट आहे, जी केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर राजकीय वादामध्ये देखील त्याला महत्त्वाचे स्थान आहे.

जगभरातील प्रसिद्ध आणि सर्वात महागडे ‘मशरूम’, खरेदी करण्यासाठी लागतील लाखो रुपये!
Follow us on

मुंबई : मशरूम ही एक गोष्ट आहे, जी केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर राजकीय वादामध्ये देखील त्याला महत्त्वाचे स्थान आहे. काही महिन्यांपूर्वी याच मशरूममुळे भारतीय राजकारणात बरीच चर्चा झाली होती. राजकारणाची बाब वेगळी आहे, पण मशरूम आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. आपण आपल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडून खरेदी करतो तच मशरूम नव्हे तर, मशरूमच्या अनेक आणखी प्रजाती आहेत, ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल!(Most Expensive mushrooms in the world)

खरं तर, जगभरात मशरूमचे बरेच प्रकार आढळतात आणि त्यापैकी बर्‍याच मशरूमची किंमत दोन हजार रुपये नाही तर, प्रति किलो तब्बल 8-10 लाख रुपयांपर्यंत असते. होय, बरेच मशरूम इतके दुर्मिळ आहेत की, त्यांचे मूल्य लाखोंमध्ये आहे. अशी अनेक प्रकारची मशरूम केवळ परदेशातच नाहीत, तर भारतातही आढळली आहेत, ज्यांची किंमत खूप महाग असून, ते शरीरासाठी फायदेशीरही आहेत. चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या मशरूमविषयी, जे खरेदी करण्यासाठी मोजावे लागतात लाखो रुपये…

व्हाईट ट्रफल मशरूम

युरोपियन व्हाईट ट्रफल मशरूम हा जगातील सर्वात महागडा मशरूम मानला जातो. हा एक बुरशीचा प्रकार असला, तरी त्याला मशरूम म्हणून देखील मानले जाते आणि जगात हे फारच दुर्मिळ मशरूम आहे. जर आपण किंमतीबद्दल बोललो, तर ते प्रति किलो 7-9 लाख रुपयांपर्यंत विकले जातात. या मशरूमची लागवड केली जात नाही, तर हे जुन्या झाडांवर बुरशीच्या रूपात वाढतो. तसेच, याला जगभरात मोठी मागणी आहे आणि किंमतही खूप जास्त आहे.

मात्सुटके मशरूम

हे एक जपानी मशरूम आहे, ज्याला मात्सुटके मशरूम म्हणतात आणि त्याच्या सुगंधामुळे ती प्रसिद्ध आहेत. हा हलका तपकिरी मशरूम एक फॉर्म्ड मशरूम आहे, ज्याला टोपी देखील आहे. हे मशरूम खूप चवदार असल्याचे, खाणारे व्यक्ती सांगतात. याची किंमत प्रति पौंड 1000 ते 2000 डॉलर आहे. म्हणजेच दर किलोला सुमारे 3 ते 5 लाख रुपये मिळतात (Most Expensive mushrooms in the world).

ब्लॅक ट्रफल

व्हाईट ट्रफलप्रमाणेच ब्लॅक ट्रफल्स देखील खूप दुर्मिळ आणि महाग असतात. या मशरूमचा शोध घेण्यासाठी ट्रेंड कुत्र्यांची मदत घेतली जाते. त्याची किंमत प्रति किलो 1 लाख ते 2 लाख रुपये दरम्यान आहे.

मोरेल्स

मोरेल्स देखील जगातील महागड्या मशरूमपैकी एक आहे. हे मार्च आणि मे महिन्यात आढळते आणि ताजे खाल्ले जाते. त्याची किंमत इतकी नाही, परंतु जर तुम्हाला हा किलोवर विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागेल.

चँटेरेल्स

महागड्या मशरूममध्ये चँटेरेल्स नाव समाविष्ट आहे. हे मशरूम युरोप आणि युक्रेनमध्ये बीच ट्रीच्या आजूबाजूला आढळते. वेगवेगळ्या रंगात येणाऱ्या या मशरूमची किंमत प्रति किलो 30 ते 40 हजार रुपये आहे.

भारतातील महागडे मशरूम

भारतातही असे अनेक मशरूम आढळतात, जे खूप महागडे आहेत. हिमालयात मिळणारे मशरूम हे अतिशय महागडे आहेत. यात गुची मशरूमचेही नावही सामील आहे. अनेक सेलिब्रिटींनी या मशरूमचे फोटो शेअर करतानाही पाहिले असेल. हिमालयात आढळणाऱ्या या मशरूमची किंमत सुमारे 20 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

(Most Expensive mushrooms in the world)

हेही वाचा :