Mouth Ulcers: तोंडात वारंवार फोड येण्याने त्रास होत असेल; तर, करून पहा ‘हे’ घरगुती उपाय!

| Updated on: Jul 31, 2022 | 7:27 PM

तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. हे तुम्हाला तोंडाच्या अल्सरपासून आराम देण्याचे काम करेल. जाणून घ्या, तोंडाचे फोड घालविण्यासाठी घरगुती उपाय.

Mouth Ulcers: तोंडात वारंवार फोड येण्याने त्रास होत असेल; तर, करून पहा ‘हे’ घरगुती उपाय!
Follow us on

तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे. अल्सरमुळे खाणे-पिणे खूप कठीण होते. काहीवेळा बोलणेही खूप कठीण होते. तोंडातील फोड खूप वेदनादायक (very painful) देखील असतात. जीभ, ओठ आणि आजूबाजूला कधीही फोड येतात. यामुळे तोंडात जळजळ देखील होते. अशा प्रकारचे फोड विशीष्ट प्रकारच्या व्हायरसने संक्रमित (infected with a virus) झाल्यामुळे होतात. फोडांच्या सामान्य कारणांमध्ये निर्जलीकरण, पोट खराब होणे, तणाव, बद्धकोष्ठता (Constipation) आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत ते बरे करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्याने फोड लवकर बरे होतात. पण जर तुमच्याकडे ही क्रीम नसेल तर तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. हे उपाय तोंडातील फोड बरे करण्यास मदत करतील.

मध

मधामध्ये नैसर्गिकरित्या प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे अल्सर बरे करण्यास मदत करतात. फोंडामुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी देखील मध उपयुक्त ठरते. त्यासाठी तोंडातील फोडांवर थोडे मध लावा. काही तास तसंच राहू द्या. यामुळे तुम्हाला आराम वाटेल.

खोबरेल तेल

नारळाच्या तेलामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. हे अल्सरवर नैसर्गिकरित्या उपचार करण्यास मदत करतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. ते अल्सरमुळे तोंडात सूज आणि वेदना कमी करण्यास देखील मदत करतात.

तुळशीची पाने

तुळशीची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. हे अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. यासाठी ताजी तुळशीची पाने चावून खावीत. त्यानंतर पाणी प्यावे. या तुळशीच्या पानांमुळे अल्सरपासून आराम मिळतो.

टूथपेस्ट

टूथपेस्ट केवळ दात स्वच्छ करण्याचे काम करत नाही तर ते अल्सर बरे करण्यास देखील मदत करू शकते. यासाठी तोंडाच्या व्रणांवर टूथपेस्ट लावा. हे अल्सर होणारे संक्रमण काढून टाकते. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

हळद

हळदीचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय जेवणात केला जातो. हे अन्नाची चव आणि रंग दोन्ही वाढवते. त्यात प्रतिजैविक गुणधर्म आहेत. तोंडाच्या अल्सरमुळे होणारी जळजळ आणि वेदना यांच्याशी लढण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यासाठी थोड्या प्रमाणात हळद पावडर घ्या. त्यात थोडे पाणी घालावे. ही पेस्ट रोज सकाळी आणि संध्याकाळी फोडांवर लावा. हे अल्सरपासून मुक्त होण्यास मदत करेल.