मुंबई : आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणूमुळे लोकांनी त्यांच्या रोग प्रतिकारकशक्तीकडे अधिक लक्ष देणे सुरू केले आहे. कोरोना काळापासून लोकांसाठी हे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. जर, आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट असेल आणि शरीरात लठ्ठपणा नसेल, तर कोणताही रोग आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखण्यासाठी मशरूमचे सेवन लाभदायी आहे (Mushroom can be beneficial for boosting immunity).
मशरूम लोक आवडीने खातात. मात्र, ते दैनंदिन न घाता अगदी कधीकधी खाल्ल जातं. मात्र, आहारतज्ज्ञांनुसार मशरूमचा समावेश दररोजच्या जेवणात केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. खाण्यासाठी चविष्ट असण्यासोबतच त्याचे शरिराला अनेक फायदे आहेत. मशरूममध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. असं असलं तरी त्यात अनेक पोषकतत्व असतात. मशरूम अनेक प्रकारे खाता येतं. याची करी, सलाड, सूप किंवा भाजी असे अनेक प्रकार केले जाऊ शकतात.
मशरूममध्ये पोटॅशियम, प्रथिने, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, जीवनसत्त्वे सी, बी आणि डी सारख्या बरेच पौष्टिक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरास अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. मशरूमचे सेवन केल्याने आपल्या हाडांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
मशरूममध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे खाणाऱ्याला भूक कमी लागते. एकदा मशरूम खाल्ल्यास बराच वेळ खाणाऱ्याला भूक लागत नाही. 5 पांढऱ्या मशरूममध्ये किंवा एका पोर्टेबेला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरी असतात. हे खाल्ल्यामुळे पोट लवकर भरतं. तुम्ही मशरूम खाऊन जंक फूड आणि अतीसेवनापासूनही वाचू शकतात (Mushroom can be beneficial for boosting immunity).
‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.
न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते. ‘मशरूम’च्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता.
(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Mushroom can be beneficial for boosting immunity)
मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!https://t.co/lxsw0Honnb#fruits #Sugar #Health #Immunity
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020