मुंबई : उन्हाळा ऋतू आला आहे आणि उकाडा देखील वाढत आहे. वर्क फ्रॉम होम (Work From Home) दीर्घकाळापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये उन्हाळ्याची भर पडत आहे. ज्यामुळे काम करण्यासाठी आसपासचे वातावरण उत्साहवर्धक असणे आवश्यक आहे. घरातील बेडरूम्स व लिव्हिंग रूम्सना आता कार्यालयांचे रूप मिळाले असताना तुम्हाला कामकाजाच्या व्यस्त दिवसामध्ये योग्य संतुलन राखण्यास मदत करणारी जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे (Must Have this products in home during summer to get cooling and relief while doing work from home).
तुम्ही गेल्या वर्षीपासून वर्क फ्रॉम होम करत आहात, ज्यामुळे कामासाठी स्वतंत्र जागा नसल्यास कामामध्ये मन लागत नाही. उत्तमरित्या रचना असलेले फर्निचर, स्नॅक्स व पेय ठेवण्यासाठी पुरेशी जागा, गोपनीयता, सकारात्मक ऊर्जा आणि उत्तम प्रकाशयोजना असलेले कार्यस्थळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम करणे सुरूच ठेवत असताना यंदाच्या उन्हाळ्यामध्ये घरातूनच काम करण्याचा अनुभव उत्साहवर्धक करता येण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
बहुतांश भारतीय घरे ‘होम ऑफिस’मध्ये बदलता येईल अशा रूपात डिझाईन करण्यात आलेली नाहीत. म्हणून घरामध्ये सुलभपणे सामावून जाऊ शकेल असे फर्निचर असणे महत्त्वाचे आहे, जे बहुउद्देशीय देखील असेल. तुम्हाला थोडीशी मोकळी जागा सोडून बेडरूममध्ये काम करायला आवडत असेल, तर बे वर्क डेस्कची शिफारस करता येईल. यामध्ये बेड आणि कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही खुर्चीशी उत्तमरित्या संलग्न होऊ शकतील असे हच आणि स्विवेल आर्म आहे. बेडरूममध्येच आरामशीपरणे पारंपारिक ऑफिस सेटअप निर्माण करा.
आपण घरामध्येच बंदिस्त झालो आहोत आणि आपल्या बैठेकाम करण्याच्या शैलीमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे आपली आसनव्यवस्था आकर्षक असण्यासोबत आल्हाददायी असणे आवश्यक आहे. डेस्कसमोर खुर्चीवर बसून काम करण्याच्या पद्धतीला काहीसा विरंगुळा द्या आणि लाऊंज खुर्चीवर काम करण्याचा उत्साहवर्धक अनुभव घ्या. आम्ही वर्क डेस्क असलेल्या फ्लाइट चेसची शिफारस करतो, जे लिव्हिंग रूममध्ये सुलभपणे सामावून जाऊ शकते आणि पाय ताणून लांब करत लॅपटॉप्स / टॅब्लेट्सवर काम करण्याची सुविधा देते. ज्यामुळे तुम्हाला काम करण्याचा आरामदायी अनुभव मिळेल.
बेडरूम ही घरातील महत्त्वाच्या जागांपैकी एक आहे. स्वत:साठी मोकळी जागा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुम्हाला सध्याच्या तणावपूर्ण काळामध्ये सर्व चिंतांपासून आराम मिळेल. आम्ही अॅपेक्स बेडरूम सेटची शिफारस करतो, जो आरामदायी सुविधेची खात्री देतो आणि यामध्ये वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेज युनिट देखील आहे. ज्यामुळे तुम्ही सामान ठेवण्याची चिंता न करता आरामदायी जीवनाचा आनंद घेऊ शकता.
महामारीदरम्यान लिव्हिंग रूम्सना होम ऑफिसचे रूप मिळाले आहे. वर्क फ्रॉम होम पुढे सुरूच राहण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला काम करताना आरामदायी सुविधा देण्यासोबत किफायतशीर असलेल्या फर्निचरची गरज आहे. आम्ही ‘बॉबीन रेंज ऑफ सोफाज’ची शिफारस करतो, जे लिव्हिंग रूम अधिक आकर्षक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि तुम्ही आरामशीरपणे काम करण्यासोबत कुटुंबासोबत एकत्रित उत्तम क्षणांचा आनंद घेण्याची खात्री देते (Must Have this products in home during summer to get cooling and relief while doing work from home).
या त्रस्त करणाऱ्या उकाड्यामध्ये उत्तमरित्या हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे आणि थंडगार पेयांव्यतिरिक्त या उकाड्यामध्ये आपल्याला उत्तमरित्या दिलासा देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. पण, क्लायण्टसोबत मीटिंग सुरू असताना मध्येच थंडगार पाणी पिण्याची सुविधा कोण देऊ शकतो? आम्ही क्यूबची शिफारस करतो. हे तुम्हाला थंडावा देणारे कॉम्पॅक्ट पर्सनल कूलिंग सोल्यूशन आहे, जे पाणी, सरबत व लस्सीला थंड ठेवते. यामध्ये फ्रॉस्ट नसून ते 100 टक्के पर्यावरण अनुकूल आहे आणि याचा मेन्टेनन्स देखील कमी आहे.
उन्हाळ्यामध्ये अधिक उकाडा जाणवतच असतो, ज्यामुळे कधी-कधी काम करताना खूपच असह्य वाटते. वर्क फ्रॉम होम आरामदायी करण्यासाठी योग्य एअर कंडिशनरची निवड करा, जे तुम्हाला थंडावा देण्यासोबत तुमचे वीज बिल कमी असण्याची खात्री देईल आणि सोबतच कार्बनचे प्रमाण कमी करेल. आम्ही ‘नॅनो-कोटेड अॅण्टी-व्हायरल फिल्ट्रेशन टेक्नोलॉजी’ असलेल्या ‘एअर कंडिशर्सच्या नवीन श्रेणी’ची शिफारस करतो. हे तंत्रज्ञान नॅनो कोटेड फिल्टर पृष्ठभागाच्या संपर्कात येणारे ९९.९ टक्के विषाणू व जीवाणू कण दूर करते आणि तुमच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासोबत घरातील स्वच्छतेमध्ये सुधारणा करते.
महामारीदरम्यान ईकॉमर्स डिलिव्हरीजमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे डिलिव्हरीजच्या पॅकेजिंगमधून विषाणूचा संसर्ग होण्याची चिंता देखील वाढली आहे. चिंता करण्यापेक्षा आम्ही प्रतिबंध या सर्वोत्तम उपायाला प्राधान्य देत यूव्ही केस डिसइंफेक्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतो. हे यूव्ही-सी तंत्रज्ञानाचा वापर करते आणि लीक-प्रूफ व सीएसआयआर प्रमाणित आहे. हे डिवाईस मिनिटांमध्ये व्यक्तींद्वारे दररोज वापरण्यात येणा-या प्रत्येक गोष्टीचे निर्जंतुकीकरण आणि सॅनिटाईज करू शकते (Must Have this products in home during summer to get cooling and relief while doing work from home).
आजच्या काळात स्क्रिन टाईम वाढला असल्यामुळे व्हिज्युअल रिफ्रेशर असलेच पाहिजे. आम्ही इनडोअर प्लाण्ट्सची शिफारस करतो, जे नैसर्गिक पद्धतीने हवेचा दर्जा वाढवतात आणि उन्हाळ्यातील उकाड्यामध्ये घरातील वातावरण अधिक आरामदायी ठेवतात. तसेच ते अधिक काळापर्यंत स्क्रिन्सवर पाहिल्यानंतर आपल्याला व्हिज्युअल आराम देतात. अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत, जे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेले प्लाण्ट्स निवडण्यास मदत करू शकतात. तसेच हे प्लाँट्स तुम्हाला लॉकडाऊनमध्ये आरामदायी वाटण्यासाठी स्वत:ची हरित बाग निर्माण करण्यामध्ये देखील मदत करू शकतात.
कधी-कधी घरातूनच काम करण्याच्या तणावामुळे आपल्याला असह्य वाटण्यासोबत थकल्यासारखे वाटू शकते. दिवसभराच्या तणावपूर्ण कामकाजानंतर प्रफुल्लित होण्यासाठी एसेन्शियल्स ऑईल्स तणावापासून आराम देण्यामध्ये आणि तुमची मन:शांती व ऊर्जा वाढवण्यामध्ये मदत करू शकतात. आम्ही डिफ्यूजरची शिफारस करतो, जे सुगंधी तेलांचा गंध पसरवण्यासोबत घराला जेन नेस्टमध्ये रूपांतरित करतात.
तुम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असाल किंवा पहाटे लवकर उठत असाल तर कामावर लक्ष केंद्रित करण्यामध्ये मदत करणारी प्रकाशयोजना आवश्यकच आहे. दीर्घकाळापर्यंत कम्प्युटर स्क्रिन्ससमोर काम केल्याने डोळ्यांवर ताण निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे स्क्रिन ब्राइटनेस कमी करण्याची गरज निर्माण होते. आम्ही घरामध्येच उत्तम प्रकाशयोजना असलेले कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी अॅडजस्टेबल टास्क लाइट्स आणि ओव्हरहेड लायटिंगची शिफारस करतो.
वर्क फ्रॉम होमचे फायदे-तोटे असू शकतात. पण, तुमच्या विद्यमान जागेमध्ये काही सुधारणा करत वर्क फ्रॉम होम उत्तम करण्यासाठी कोणतेही कारण शोधण्याची गरज नाही.
(Must Have this products in home during summer to get cooling and relief while doing work from home)
Coriander Water Benefits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘धण्याचं पाणी’
Health Tips : काढा अधिक पिणे ठरु शकते हानीकारक, जाणून घ्या तोटे
Zodiac sign: ‘या’ पाच राशीचे लोक ऐषोआरामी जीवन जगतात आणि फॅशनेबल राहतात https://t.co/WZOCglKU6G #astrology #Fashion #Horoscope #ZodiacSign
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021