मुंबई : भारतातील प्रत्येक घरांच्या स्वयंपाकघरात मोहरीचे तेल सहज उपलब्ध होते. मोहरीचे तेल नैसर्गिकरित्या जाडसर असते आणि तीक्ष्ण गंधाने अन्नाला चांगली चव देते. याचा वापर बहुतेकवेळा स्वयंपाक घरात अन्न शिजवण्यासाठी केला जातो. मात्र, हे तेल केवळ खाण्यासाठीच नाही तर, मोहरीचे तेल त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील उपयोगी आहे. पण, तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत काय? चला तर, आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे केसांना होणारे फायदे सांगणार आहोत. (Mustard oil is beneficial for hair)
रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यामध्ये मोहरीचे तेल घ्या आणि त्यामध्ये मेथीचे दाणे भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाच ते सात मिनिटांसाठी गॅसच्या मध्यम आचेवर हे तेल गरम करा. मेथीच्या बियांचा रंग काळा झाल्यास गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. मोहरीच्या तेलामुळे केसांशी संबंधित कित्येक समस्या दूर होण्यास मदत मिळते. आजही कित्येक जणी हेअर केअर रुटीनमध्ये मोहरीच्या तेलाचा समावेश करतात. कारण हा उपाय प्रभावी व पूर्णतः नैसर्गिक आहे.
तेल जरासे कोमट झाले की, केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावा. मुळांसह संपूर्ण केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. यानंतर कंगवा करा आणि केस बांधा. यानंतर तासाभरानंतर हर्बल शॅम्पूने आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्यास केस मजबूत, घनदाट आणि जाड होण्यास मदत मिळेल (Mustard oil is beneficial for hair).
हवे असल्यास आपण रात्रभर देखील केसांमध्ये तेल लावून ठेवू शकता. आठवड्यातून तिनदा हा उपाय करावा. काही लोकांचे केस मुळातच पातळ असतात. तर, योग्य देखभाल न केल्याने काही जणांचे केस पातळ होतात. केसांना आतील व बाहेरील बाजूनेही पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी मोहरीचे तेल गुणकारी ठरते. केस वाढीसाठी केवळ आयुर्वेदिक तेलांचा वापर करण्यापेक्षा आपल्या आहारामध्ये आवळा, बीट, डाळिंब आणि अक्रोड यासारख्या पौष्टिक पदार्थांचाही समावेश करावा.
(Mustard oil is beneficial for hair)
केळीच्या सालाचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? तर मग ‘हे’ खाणे टाळाच
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
https://t.co/jIDRJ9wxHL #papayaseedsbenefit | #papaya | #lifestyle— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2021