आपल्या हिंदू धर्मात अशी अनेक झाड आहेत ज्यांची आपण सर्वजण मनोभावे पूजा हि करत असतो. त्यातील एक म्हणजे तुळशीचे झाड. आयुर्वेदात देखील तुळशीला फार महत्व आहे. कारण तुळस ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात लावलेली आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावून पूजा केल्याने घरात सुख-शांती येते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.
त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीच्या वनस्पतीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यापैकी एक म्हणजे तुळशीभोवती ठेवलेल्या वस्तू, या तुम्हाला अशुभ फळ देखील देऊ शकतात. याकरिता आपण तुळशीच्या झाडासोबत कोणत्या वस्तू ठेवल्या नाही पाहिजे जेणे करून आपल्या घरात त्याचा वाईट परिणाम होणार नाही व घरात अशांतता निर्माण होणार नाही. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊयात
वास्तुशास्त्रानुसार निवंडुगाची रोप कधीही तुळशीच्या झाडाजवळ ठेवू नयेत कारण निवडुंगाचे झाड काटेरी असतात आणि हे तीक्ष्ण काटे संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यासोबतच ही वनस्पती तुळशीजवळ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. व कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि राग वाढू शकतो. तसेच आपल्या भारतीय वास्तुशास्त्रात या वनस्पतीला घरात ठेवणे अशुभ मानले जाते.
घरात तुळशीच्या झाडाजवळ शमीचे रोप कधीही ठेवू नये. जर तुम्ही शमीचे रोप लावत असाल तर लक्षात ठेवा की दोन्ही रोपांमध्ये कमीत कमी ४ ते ५ फुटांचे अंतर असावे, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या जवळ अशी कोणतीही रोपं ठेऊ नका, ज्यांच्या खोडातून व पानातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो कारण जेव्हा या दोन अशा प्रकारची रोपं एकत्र असतात तेव्हा आपल्या घरात नकारात्मकता वाढते, ज्यामुळे कलह आणि क्लेश निर्माण होऊ शकतो.