सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वांनीच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट सज्ज झाले आहेत. अनेकजण अजूनही हॉटेलची बुकिंग करत आहेत. पण त्यांना बुकिंग मिळत नाहीये. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी जाण्याचा प्लान आखला जात आहे. अनेक ठिकाणी तर भव्यदिव्य पार्ट्या होणार आहेत. त्यासाठीही लोकांनी तयारी केली आहे. ख्रिसमसची धमाल केल्यानंतर आता नववर्षाच्या पार्टीमोडमध्ये लोक गेले आहेत.
असं असलं तरी पार्टीत काय घातलं पाहिजे? यामुळे मुली बऱ्याच कन्फ्यूज्ड असतात. तुम्हाला जर नव वर्षाच्या पार्टीत जायचं असेलतर तुम्ही बी टाऊन सेलिब्रिटीचे आऊटफिट पाहून आयडिया घेऊ शकता. नव्या वर्षाच्या पार्टीत तुम्ही या अभिनेत्रींचा लुकआऊट रिक्रिएट करू शकता. कोणत्या अभिनेत्रींचा कोणता आऊटफिट भारी आहे, याचीच आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.
कृति सेननचा रस्ट ऑरेंज को-ऑर्ड सेट पार्टीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. तिच्या को-ऑर्ड सेटमध्ये एसिमॅट्रिक टॉप सुद्धा आहे. कृतिने मिनिमल एक्सेसरीजसोबत तिचा लुक कम्प्लिट केला आहे. कोहल आय मेकअप आणि न्यूड लिप शेडमुळे तिचं सौंदर्य खुलून उठलं आहे.
फॅशनच्या बाबतीत शिल्पा शेट्टीचा हात कुणीच पकडणार नाही. ती पार्टीत वन शोल्डर स्लीव्ह असलेला मरून शिमर ड्रेस परिधान करते. तिच्या हातात ब्रेसलेटची ग्रेस सुंदर दिसते. शिल्पाने नेपर्ल वर्क चोकर नेकलसे सुद्धा पेयर केलं आहे.
कॅटरीना कैफचा सिल्वर स्ट्रॅपी ड्रेस नवीन वर्षाच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे. तिचा शॉर्ट ड्रेसमध्ये डीप व्ही नेकलाइनची डिटेलिंग देण्यात आली आहे. तिने फ्रिजी हेअरस्टाइल सोबत गोल्डन मेकअप पेअर केला आहे. कॅटच्या कानात स्टोन स्टडेड इरिंग्स घातले आहेत. त्यामुळे तिचा लूक अधिकच भारी वाटतोय.
सुहाना खानचा ब्लॅक शिमरी गाउन अत्यंत सुंदर आहे. या गाउनमध्ये तिचे कर्व्स सुद्धा फ्लॉन्ट होत आहेत. सुहाना खानने हाईलायटेड चीक्स आणि स्लीक मिडल पार्टींगसह तिचा लुक पूर्ण केला आहे.