मुंबईः मुंबईतील एका मॉलमध्ये हातात हात घालून फिरणाऱ्या एका मुलीला आणि मुलाला एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मग बुद्धीला ताण देत अगदीच रुळलेलं उत्तर दिलं. तो प्रश्न होता, हे प्रेम येतं कुठून? मग नुकताच प्रेमात पडलेल्या त्या प्रेमवीरानं सांगितलं की, प्रेम (Love) ना ह्रदयातून येत ना मेंदुतून प्रेम मिळतं ते फक्त योगायोगानं. असं त्या तरुणानं एकदम जोशात उत्तर दिलं, आणि त्या उत्तराला जोडूनच त्याच्या बरोबर असलेल्या मोहतरमाने (Lovers) तेच उत्तर सुधारत म्हणाली की, खरं प्रेम योगायोगानं होत असलं तरी त्याला नशीबाचीही साथ लागते. या त्यांच्या प्रश्नानंतर सवाल जवाब असं करणाऱ्या त्या सामाजिक संस्थेनं त्या लव्हबर्डच्या (Love Birds) उत्तराबरोबर त्यांचं संशोधन त्यांनी चालूच ठेवलं आणि अनेकांना मग पुन्हा तोच आणि एकच प्रश्न केला की, प्रेम ह्रदयातून येतं की मेंदुतून.
नशिबावर तुमचा विश्वास असेल तर म्हणतात की, नशिबामुळे तुमच्यासोबत एखादा सुंदर योगायोग घडतो, आणि क्षणार्धात तुम्हाला कोणीतरी आवडू लागतं. आणि त्यालाच सगळे मग पहिलं प्रेम म्हणतात. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम, हेच बहुदा पहिला प्रेम असतं. हे काही ढोबळ मानाने आणि कुणीही सांगितलं तरी पटतं, आणि त्याला जर संशोधनाची जोड मिळाली तर मग ते शंभर टक्के पटतं. कोणाला तरी पाहता आणि तुमच्या मेंदूत एकाच वेळी रिअॅक्शन तयार होतात, आणि माणूस प्रेमात पडतो.
ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनंही सांगितली जाते, पहिल्या नजरेत तुम्हाला कुणीतरी दिसतं आणि तुमचं ह्रदय प्रेमानं धडधडू लागतं, तर ते तुमच्या ह्रदयापासून ती सुरुवात झालेली नसते तर तर आधी ती भावना तुमच्या मेंदूत तयाार झालेली असते. म्हणून तुम्ही काहीही म्हणा तुमच्या प्रेमाची सुरुवात ही ह्रदयापासून नाही तर ती तुमच्या मेंदूपासून झालेली असते.
न्यूयॉर्कमधील सिराक्यूज विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या संशोधनानुसार सांगितलं गेलं आहे की, प्रेमात पडणं म्हणजे फक्त आपली भावना आणि आपल्या स्वभावात बदल होतो असं नाही तर या सगळ्यांबरोबर मेंदूतील काही भागावरही याचा परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्याच्या मेंदूत डोपेमाईन (Dopamine), ऑक्सिटोसिन (oxytocin), एड्रेनलिन (adrenaline) आणि वॅसोप्रेसिन (vasopressin) सह आपल्याला उत्साहित ठेवण्यासाठी या 12 हार्मोन्सच्या स्त्रावात वाढवते. त्यामुळेच प्रेमात पडला की, तुम्हाला सगळच चांगलं आणि नवंनवं वाटू लागतं. लोकांना अधिकाधिक ऊर्जा आल्यासारखी, शक्ती मिळाल्यासारखी वाटू लागते. तर काही माणसं प्रेमात पडल्यावर त्यांच्या सुप्त मनातील इच्छा आकांक्षाना वाट मोकळी करुन देतात. तर काही बिघडलेली माणसं प्रेमात पडल्यानंतर अगदी सरळ म्हणजे सुतासारखी होतात. म्हणजे या संशोधनाचा अर्थ हाच आहे की, प्रेम कधीही, कुठेही आणि कुणाबरोबरही होऊ शकतं. म्हणून या गोष्टी मग खऱ्या वाटू लागतात. या संशोधनामध्ये मात्र 0.2 सेकंदामध्ये प्रेम होऊ शकतं असं म्हटलं आहे.
एक गोष्ट खरी आहे की, प्रेम दिल से नही दिमाग से होता है. ही गोष्ट ही शंभर टक्के खरी असली तरी त्यामध्ये तुमच्या ह्रदयाचीही भूमिका महत्वाची असते. प्रेमाचा हा सगळा खेळ होतो तो आपल्या मेंदूतूनच कारण हार्मोन्सच्या स्त्रावाला याच गोष्टी कारणीभूत असतात. प्रेम झाल्यानंतरच्या काळात नियमित असणारे हार्मोन्स अनियमित होऊन वेगळे परिणाम दाखवू लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर अॅड्रेनलिन हा स्त्रव तुम्हाला काही तरी शंकास्पद किंवा काही धोकादायक वाटू लागतो तेव्हाच तो स्त्राव निर्माण होतो. मात्र तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडता तेव्हाही हा स्त्रव सक्रिय झालेला असतो. काही काही वेळा तुम्हाला आवडू लागलेली मुलगी अथवा आवडू लागलेला मुलगा तुमच्या समोर आला की, तुमच्या हाताला घाम येऊ लागतो, तर कधी तुमचे ओठ सुके पडू लागतात आणि ह्रदयाची धडधड वाढू लागते. या अशा परिस्थितीतच अॅड्रेनलिनच्या कारणामुळे आणि ह्रदयात वाढलेल्या धडधडीमुळे मग निरागस झालेल्या मनामुळे तुम्ही कुणालातरी प्रेमाचं ह्रदय देऊन मोकळे होता.
तुमच्या मनात किंवा हृदयात तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी तुमसे मिलने को दिल करता है हे गाणं वाजू लागतं ते तुमच्या ह्रदयामुळे नव्हे तर डोपेमाईन या हार्मोन्समुळे. बाकीच्या हार्मोन्ससारखाच हा हार्मोन्सही मेंदूद्वारेच नियंत्रित होतो. आणि त्यासाठी ह्रदयातील मस्तीत असणाऱ्या रक्ताला ते आणखी जास्त सक्रिय करते. प्रेमासाठी संबंधित प्रत्येक इच्छेसाठी काही हार्मोन्स जबाबदार असतात, जसे काळजी घेण्याची इच्छा ऑक्सिटोसिनमुळे होते आणि एकत्र राहण्याची इच्छा व्हॅसोप्रेसिनमुळे होते.
प्रेमात पडल्यानंतर बायोकेमिस्ट्रीनुसार इतके हार्मोन्स तयार झाल्यामुळे मेंदूच्या नसा सक्रिय करणाऱ्या घटकांची पातळी वाढते. त्यामुळे प्रेमाच्या आणि मेंदूच्या झालेल्या संशोधनानुसार असेही स्पष्ट होते की, दोन्हीही गोष्टी एकमेकांवर तितक्याच प्रमाणात अवलंबून असतात, त्यामुळेच प्रेमात पडल्यावर दोघांकडूनही हे हार्मोन्सच घटक सक्रिय होतात, आणि तुम्ही प्रेमात पडता. आणि यासाठी माणसाला एक रिकामं डोकं लागतं कारण नाही म्हटलं तरी प्रेम हे मनातूनच निर्माण झालेलं असत.
संबंधित बातम्या