नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC)अधिकृत ट्विटर अकाऊंट रविवारी हॅक (Hack) झाले. देशातील महत्वाच्या संस्थेचे twitter सोशल मीडियाचे अकाऊंट (Social Media) हॅक होणारी ही तिसरी घटना आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचेही गेल्या दोन दिवसांत हॅक झालेले हे तिसरे प्रमुख ट्विटर खाते आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india .या ट्विटर अकाऊंटचे 2 लाख 96 हजार इतके फॉलोवर्स (Followers) आहेत. यूजीसीचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्या पाठिमागे कोणाचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. यूजीसीचे हे ट्विटर अकाउंट पूर्ववत करण्यासाठी UGC कडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
UGC India’s official Twitter account hacked. pic.twitter.com/t37ui8KNuC
— ANI (@ANI) April 9, 2022
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्विटर अकाऊंचा ताबा काही अज्ञात हॅकर्सनी घेतला होता. यूजीसीच्या ट्विटरचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी अनेक अनोळखी लोकांना टॅग केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. अकाऊंट हॅक झाल्यानंतर प्रोफाईल फोटोही बदलून तो व्यंगचित्राचा ठेवण्यात आला होता. हा फोटो अनेकांना टॅगही करण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या अकाऊंटवरुन देशातील जोडल्या गेलेल्या विद्यापीठ, अधिनियम, प्राध्यापक भरती, संशोधन आदी घटनांविषयी माहिती देण्यात येते मात्र रविवारी अकाऊंट हॅक झाल्यानंतर मात्र त्यावरुन व्यंग्यचित्राचे प्रोफाईल फोटो लावून तो अनेकांना टॅग करण्यात आला होता.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india या युजरनेम असलेल्या ट्विटर हँडलचे सध्या जवळपास जवळपास तीन लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत. खाते त्याच्या अधिकृत वेबसाइटशी देखील जोडलेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) ट्विटर हँडलही शनिवारी हॅक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या हॅकिंगमागे कोणाचा हात आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनीही या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाउंट पाठोपाठ हवामान खात्याचे ट्विटर हॅक झाल्याने याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्विविटरवरुन नव्या नियमांची माहिती, विद्यापीठांची माहिती, शिक्षण क्षेत्रातील नव्या घडामोडी आणि अधिनियम सांगितले जातात. नेट-सेट, गेट यासारख्या परीक्षांची माहिती, संशोधन आणि इतर माहितीही दिली जाते. शिक्षण क्षेत्रातील आणि देशातील महत्वाची आणि मोठी संस्था असल्याने त्याच्या सुरक्षिततेचाही प्रश्न महत्वाचा असल्याचे यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अकाऊंट हॅक झाल्यानंतर माहिती घेण्यात येत असून ते कुणी का केले असावे याचा शोध घेण्यात येत आहे.
शिकाऱ्याने घोरपडीवर केला बलात्कार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून वनविभाग चक्रावलं