तेलकट त्वचा, कोरडे केस, डिहायड्रेशन… उन्हाळ्याच्या समस्यांपासून स्वत:ला ‘असं’ ठेवा सेफ

| Updated on: Mar 27, 2023 | 1:05 PM

उन्हाळा हा आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी अनेक समस्या घेऊन येतो. तेलकट त्वचा, पिंपल्स, त्याचप्रमाणे केस कोरडे होणे, अशा समस्या या ऋतूत अनेकांना भेडसावतात.

तेलकट त्वचा, कोरडे केस, डिहायड्रेशन... उन्हाळ्याच्या समस्यांपासून स्वत:ला असं ठेवा सेफ
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात आता उन्हाळ्याचा (summer season) ऋतू सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने अशा काही आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे, ज्यापासून स्वत:चा बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्याबाबत निष्काळजी (careless) राहणे धोकादायक ठरू शकते. उन्हाळ्यात गरम हवा आणि कडक सूर्यप्रकाश, हे दोन घटक शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतात. जास्त उष्णतेमुळे घाम (sweating) येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

उन्हाळ्यात त्वचेसाठी तेलकट त्वचा, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या येतात. त्याचप्रमाणे या ऋतूत अनेकांचे केसही कोरडे होतात. उन्हाळ्यात होणाऱ्या या समस्यांना कशा प्रकारे तोंड देता येईल, ते जाणून घेऊया.

1) तेलकट त्वचा

उन्हाळ्यात त्वचेची आवश्यकतेपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण गरम हवा, कडक सूर्यप्रकाश, उष्णता आणि आर्द्रता यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यांची वेळीच दखल न घेतल्यास या समस्या वाढतच जातात. उन्हाळ्यात एक सामान्य समस्या जाणवते ती म्हणजे तेलकट त्वचा. तेलकट त्वचेमुळे पिंपल्स तर होतातच शिवाय चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होतात. तथापि, काही उपायांच्या मदतीने आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

तेलकट त्वचेसाठी उपाय

1) चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर वापरा. कारण मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

2) केवळ सूर्यप्रकाश टाळण्यासाठीच सनस्क्रीन वापरावे असे नाही. तुम्ही घरी असलात तरी सनस्क्रीन लावा.

3) त्वचेला जास्त प्रमाणात एक्सफोलिएट करणे टाळा. आठवड्यातून एकदा एक्सफोलिएट करणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु दररोज असे करणे टाळा. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी नेहमी सौम्य किंवा घरगुती स्क्रब वापरा.

4) नैसर्गिक फेस मास्क लावा. त्यासाठी तुम्ही मुलतानी माती, चंदन यांचा वापर करू शकता.

2 डिहायड्रेशन

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणे ही फार मोठी समस्या नाही. कारण गरम होत असताना घाम येणे अपरिहार्य असते. मात्र, वेळोवेळी स्वत:ला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. डिहायड्रेशनमुळे उलट्या होऊ शकतात. तुम्हाला खूप तहान लागू शकते, तसेच डोकेदुखी होऊ शकते आणि नंतर स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात.

डिहायड्रेशनसाठी उपाय

1) जास्त पाणी प्यावे

2) ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन घ्यावे.

3) दही खावे

4) लिंबू पाणी पिऊ शकता

5) नारळपाणी पिऊ शकता.

6) ऋतूमानानुसार येणारी फळ आणि भाज्या अवश्य खाव्यात.

3  Summer, skin problems, oily skin, dry hair, problems, उन्हाळा, त्वचेच्या समस्या, तेलकट त्वचा, कोरडे केस, समस्याकेस कोरडे होणे

उन्हाळ्यात केसांच्या समस्या वाढतात. कारण कडक सूर्यप्रकाशामुळे जास्त घाम येतो, ज्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. तथापि, काही घरगुती उपायांचा वापर करून, आपण या समस्येचा चांगला सामना करू शकता.

कोरड्या केसांसाठी उपाय

1) केसांना कोरफडीचा रस लावा.

2) केसांना नियमितपणे तेल लावून मालिश करावे, त्याने पोषण मिळते.

3) केसांवर मेथीच्या बियांचा हेअरपॅक लावू शकता.

4) चहाच्या पाण्याने केस धुवावेत.

5) आवळा आणि लिंबाचा रसही वापरू शकता.