मुंबई : कांदा हा स्वयंपाकातील आवश्यक घटक आहेत. कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर त्वचा आणि केसांनाही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यात अनेक औषधी घटक आहेत जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. सुंदर त्वचा, चमकदार केसांसाठी कांदा सर्वात गुणकारी मानला जातो. कांद्यामध्ये बरेच औषधी गुणही आहेत. (Onion can cure all problems from skin to hair, know its benefits)
1. आजकाल कमी वयातच केस गळण्याचे समस्या होत आहेत, केस निर्जीव होत आहेत. कांद्याचा रस या समस्यांपासून मुक्ती देऊ शकतो. कांद्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे या सर्व समस्यांपासून आराम मिळतो आणि केस जाड आणि चमकदार बनतात. केस मजबूत करते आणि त्याची वाढ सुधारते. ऑलिव्ह तेलामध्ये कांद्याचा रस मिसळून केसांच्या मुळांवर मालिश करा किंवा दोन चमचे मध अर्धा कप कांद्याच्या रसात मिसळा आणि मालिश करा.
2. कांद्याचा रस केसांना वेळेआधी पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामध्ये उपस्थित असलेल्या कॅटालिस नावाचे एंजाइम सफेद केसांना काळे करते आणि अकाली पांढरे होणाऱ्या प्रक्रियेस ब्रेक लावते. याशिवाय कांद्याचा रस केसांतील कोंडाची समस्याही संपवते. एका वाडग्यात कांद्याचा रस काढून टाळूवर मालिश करा आणि अर्धा तास ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. कांद्याचा वास दूर करण्यासाठी सौम्य शॅम्पूने केस धुवा.
3. चेहर्यावर डागांची समस्या असल्यास कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय चेहर्यावरील डार्कनेसही घालवतो. यासाठी एक चतुर्थांश चमचा कांद्याचा रस आणि तितक्याच प्रमाणात लिंबाचा रस मिसळा. यानंतर, 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
4. जर कांद्याचा रस लसणाच्या रसात मिसळला तर मुरुमांच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. कांद्यामध्ये जीवनसत्त्वे आणि लसूणमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. कांदा आणि लसूण दोन्ही रस समान प्रमाणात मिसळा आणि सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर तोंड धुवा. (Onion can cure all problems from skin to hair, know its benefits)
CM Uddhav Thackeray speech highlights :
12 कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा : मुख्यमंत्रीमुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील सर्व महत्त्वाचे मुद्दे – https://t.co/vXvRtrb0wB
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2021
इतर बातम्या
कोरोना संकटाच्या काळात NPS मध्ये मोठा बदल, आता अनेक फायदे मिळणार
मुंबईत नियमांचं उल्लंघन करुन लग्नसोहळा, बीएमसीची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडासह गुन्हा दाखल