मुंबई : हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते (Onion Oil recipe and hair care benefits).
परंतु आपले केस खराब होण्यास जितके गरम पाणी जबाबदार आहे तितकेच बाजारात उपलब्ध असलेली कॉस्मेटिक उत्पादने जबाबदार आहेत. आपल्या केसांवर शॅम्पू व्यतिरिक्त, आपण बरेच प्रयोग करत राहता, यामुळे आपले केस मजबूत होत नसून, उलट आणखी कमकुवत होण्याची शक्यता असते. आपल्या स्काल्पमधील केस आकुंचित होऊ लागतात.
जर आपल्याला केस गळण्याची समस्या असेल, तर कांद्याच्या तेलाने मसाज करणे आपल्यासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकते. कांदा आपल्या केसांची मुळे मजबूत करण्यासाठी मदत करतो. कांद्याचे तेल आपल्या केसांची वाढ तर सुधारतेच, पण त्यांना अकाली गळतीपासून प्रतिबंधित देखील करते. केसांच्या वाढीसाठी कांदा तेल फायदेशीर आहे आणि आपण ते घरच्या घरी कसे तयार करायचे जाणून घेऊया…(Onion Oil recipe and hair care benefits)
कांद्याचे तेल तयार करण्यासाठी प्रथम कांद्याचा रस घ्या. कांद्याचा रस काढण्यासाठी आपण ग्राइंडर वापरू शकता. सर्व प्रथम, पॅनमध्ये नारळ तेल घाला आणि या तेलात कांद्याचा रस घाला. चांगले मिसळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या व वेगळ्या भांड्यात काढा. आपण हे तेल 6 महिन्यांसाठी वापरू शकता.
कांद्याचे तेल लावण्यासाठी प्रथम आपल्या केसांचे दोन भाग करा. यानंतर तेल घ्या आणि हलके हातांनी केसांच्या मुळांवर लावा. थोड्या वेळाने, आपण केसांना शॅम्पू लावून धुवा, जेणेकरून आपल्या केसांपासून तेल निघू शकेल.
कांद्याचे तेल आपल्या केसांना खोलवर पोषण देते आणि केसांना कोरडे होण्यापासून वाचवते. या तेलाने केसांची मुळे मजबूत होतात. तसेच, कोंड्याची समस्या देखील दूर होते. हे तेल केस गळण्यास प्रतिबंध करते. तसेच, केसांच्या इतरही समस्या नाहीशा होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Onion Oil recipe and hair care benefits)
Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!#haircare | #Dandruff | #HairProblems | #BeautySecrets https://t.co/CCKZp4C5hX
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021