लाखो कंडोमचे पाकिटं अन् हजारो बर्फांची विक्री, थर्टीफर्स्टसाठी नागरिकांची अजबच ऑनलाइन खरेदी

| Updated on: Jan 01, 2025 | 7:58 PM

31st डिसेंबरला सर्वांनीच आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाच स्वागत केलं. पण सोबतच नागरिकांनी अनेक गोष्टींची ऑनलाइन शॉपिंग केली आहे. याबद्दलचा एक डेटा समोर आला असून या ऑनलाइन शॉपिंगमध्ये सर्वात जास्त खरेदी ही कंडोम आणि आईस क्यूबची झाल्याचं पाहायला मिळालं. या वस्तूंचा खरेदीचा आकडा बराच मोठा आहे.

लाखो कंडोमचे पाकिटं अन् हजारो बर्फांची विक्री, थर्टीफर्स्टसाठी नागरिकांची अजबच ऑनलाइन खरेदी
Follow us on

आज 1 जानेवारी 2025. नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. काल 31st डिसेंबरला सर्वांनीच आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाच स्वागत केलं. सर्वीकडे पार्टी, नाच-गाणे सुरु होते. तर जेवणासाठी रेस्टॉरंटही फूल होते. तर काहींनी ऑनलाइन खाण्याचे पार्सल मागवले. पण तुम्हाला माहितीये का की, फक्त ऑनलाइन पार्सल हे खाण्याचेच नाही तर काल लोकांनी पदार्थांव्यतिरिक्तही फार गोष्टींची ऑनलाइन खरेदी केल्याच समोर आलं.

ऑनलाइन या वस्तूंना जास्त मागणी होती

ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा आणि स्स्विगी इंस्टामार्टचे सह-संस्थापक फणी किशन ए यांनी एक्सवर या ऑनलाइन खरेदीविषयी महत्वाच्या बाबी शेअर केल्या आहेत. यामध्ये दोन्हीही सोशल साइटसवर नवं वर्षात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादी जाहिर केली आहे.

त्यांनी शेअर केलेल्या यादीनुसार 31st च्या संध्याकाळी सर्वात जास्त मागवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये या वस्तूंचा समावेश जास्त होता ते म्हणजे दूध, चिप्स, चॉकलेट, द्राक्षे, पनीर, आईस क्यूब, कोल्ड ड्रिंक आणि कंडोम.

आईस क्यूबच्या मागणीमध्ये वाढ झाली होती 

ऑनलाइन खरेदीमध्ये आईस क्यूबची मागणी वाढलेली पाहिली गेली. एकंदरीत, ब्लिंकिंटवर काल रात्री 8 वाजेपर्यंत 6,834 आईस क्युबस पाकिटे विकली गेली आहेत. तसेच अनेक इतर प्लॅटफॉर्मवर आईस क्यूबच्या मागणीत वाढ पाहण्यात आली. बिग बास्केटवर आईस क्यूबच्या मागणीमध्ये 1290% टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती. तसेच कोल्ड ड्रिंकच्या मागणीचेही प्रमाण फार वाढले होते.

बिगबास्केटवर अल्कोहोलशिवाय इतर पेय पदार्थांच्या विक्रीत 552% आणि डिस्पोजेबल कप व प्लेट्सच्या विक्रीत 325% वाढ झाली आहे. यावरून घरगुती पार्ट्यांना उधाण आल्याचं स्पष्ट होते.तसेच सोडा आणि मॉकटेलच्या विक्रीतही 200% पेक्षा जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली.

स्विगी इंस्टामार्टचे सह-संस्थापक फणी किशन ए यांनी ट्विट केले की, काल संध्याकाळी 7:41 वाजता बर्फाच्या विक्रीने उच्चांक गाठला होता, त्या मिनिटात 119 किलोग्रॅम बर्फ वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

कंडोमच्या विक्रीत वाढ झाली

कंडोमच्या विक्रीतही प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली. 31 डिसेंबरच्या दुपारपर्यंत कंडोमच्या 4,779 पाकिटांची विक्री इंस्टामार्टवर नोंद करण्यात आली होती. संध्याकाळ होताच या वाढीमध्ये कमालीची वाढ पाहण्यात आली. ब्लिंकिटचे सीईओ यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री 9.50 वाजता पोस्ट करून सांगितले की 1.2 लाख कंडोमचे पॅक ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

तर, आणखी एका कंपनीने कंडोमच्या फ्लेवर्सबाबत माहिती दिली, ज्यात चॉकलेट सर्वात लोकप्रिय ठरला. एकूण विक्रीपैकी 39% चॉकलेट फ्लेवर कंडोमची विक्री झाली, तर, 31% स्ट्रॉबेरी फ्लेवरची तर 19% बबलगम फ्लेवरची विक्री झाली.