मुंबई : कुंडली व्यतिरिक्त, आपले भविष्य आपल्या हातांवरील रेषांवरून देखील सांगितले जाऊ शकते. हस्तरेखाशास्त्र तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हातांच्या रेषा, रचना आणि त्यावरील खाणाखुणा व्यक्तीच्या स्वभावाचा, त्याच्या वागणुकीचा आणि भविष्याचा लेखाजोखा ठेवतात. जर, आपल्याला भविष्यात आपल्या आर्थिक स्थितीबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर, आपण आपल्या तळहातावरील काही खास चिन्हांनचा अभ्यास करून, याचा अंदाज लावू शकता (Palmistry knowledge indication of financial condition in your palm according to Palmistry).
या चिन्हांच्या विद्येला हस्तसामुद्रिक म्हणतात. ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे. भविष्य जाणून घेण्याच्या अनेक पद्धतींपैकी हस्तसामुद्रिकशास्त्र ही एक महत्त्वाची पद्धती आहे. विष्णूपुराणानुसार हे शास्त्र लक्ष्मीने विष्णूस सांगितले व ते समुद्र देवतेने ऐकून त्याचा प्रचार केला असे म्हटले जाते. त्यामुळे याला ‘हस्तमुद्रिका शास्त्र’ असे म्हणतात म्हणतात.
1- जर, तळहाताच्या मध्यभागी हस्तरेखांद्वारे आयतची आकृती बनत असेल, तर जीवन प्रवास संघर्षमय मानला जाणार आहे. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार होत राहतील. जर तुम्हाला आयुष्यात खूप पैसा कमवायचा असेल, तर अशा लोकांना खूप कष्ट करावे लागतील, तरच त्यांची इच्छा पूर्ण होईल.
2- तळहाताच्या सुरुवातीपासून, सरळ, खोल, लांब आणि स्पष्ट रेषा शेवटपर्यंत जात असेल, मग समजून घ्या की आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागणार नाही. थोड्याशा कष्टानेदेखील तुम्हाला अपार संपत्ती मिळेल.
3- जर तळहाताच्या मागे रेषा तयार झाल्या तर, याचा अर्थ तुमचे यश तुमच्या हातात आहे. जर, तुम्ही कठोर परिश्रम केलेत, तर तुम्हाला यश व संपत्ती देखील मिळेल.
4- तळहातावरील सूर्या पर्वतावर जर, अनेक रेषा असतील, तर अशा लोकांना कष्ट करूनही आवश्यक असणारी संपत्ती व यश मिळणार नाही. अशा लोकांनी सूर्यदेवाला नियमितपणे जल अर्पण करावे.
5- जर तळहाताच्या वरच्या भागावर रेषांनी त्रिकोण तयार झाला असेल, तर आपले जीवन केवळ देवाच्या भरवश्यावर अर्थात अध्यात्मात आहे. असे लोक, कठोर परिश्रम करूनही त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. यामुळे, त्यांना जीवनात अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असते.
(Palmistry knowledge indication of financial condition in your palm according to Palmistry)
सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…https://t.co/CJsN2OiaiN#ZodiacSigns #rashifal #SunTransit
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020