Peanuts Side Effects | शेंगदाण्याच्या अति सेवनाने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, वाचा याचे दुष्परिणाम

| Updated on: Jan 27, 2021 | 12:17 PM

अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे शरीराला होणारे फायदेही अधिक आहेत. मात्र, त्याचे अति सेवन केल्याने शरीराला तितकीच हानी देखील होऊ शकते.

Peanuts Side Effects | शेंगदाण्याच्या अति सेवनाने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, वाचा याचे दुष्परिणाम
शेंगदाण्यापासून अॅलर्जी असणे सामान्य आहे, परंतु नंतर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते.
Follow us on

मुंबई : ‘शेंगदाणे’ आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या स्वयंपाक घरात हमखास असतातच. बऱ्याचदा उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटामिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे शरीराला होणारे फायदेही अधिक आहेत. मात्र, त्याचे अति सेवन केल्याने शरीराला तितकीच हानी देखील होऊ शकते. काही लोकांना सतत टाईमपास म्हणून शेंगदाणे खाण्याची सवय असते. अशा लोकांनी ‘या’ दुष्परिणामांकडे लक्ष दिले पाहिजे (Peanuts side effects on health).

अॅलर्जी

असे बरेच लोक आहेत ज्यांना शेंगदाणा किंवा त्याच्या तेलापासून अॅलर्जी आहे. आपण देखील याच श्रेणीत मोडत असाल, तर शेंगदाणे किंवा त्याचा समावेश असलेले पदार्थ खाताना सावधगिरी बाळगा. याचे कारण म्हणजे शेंगदाण्यापासून अॅलर्जी असणे सामान्य आहे, परंतु नंतर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. या अॅलर्जीमुळे आपल्याला नाकातून पाणी येणे, त्वचेच्या संबंधित समस्या जसे की खाज सुटणे, पुरळ, लालसरपणा, सूज येणे, तोंडात आणि घशात खवखव येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

सोडियमचे प्रमाण वाढते

शेंगदाण्याची चव वाढवण्यासाठी बरेचदा लोक त्यात मीठ टाकून खातात. तर, बऱ्याच लोकांना मीठ घालून शेंगदाणे खायला आवडते. मात्र, हे मीठ आपल्या रक्तदाबावर गंभीर परिणाम करू शकते. अधिक शेंगदाणे खाल्ल्यास, हे लवण आपल्या शरीरात जाते, ज्यामुळे आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू लागते. म्हणून, शेंगदाणे नेहमी कमी प्रमाणातच खावेत (Peanuts side effects on health).

वजन वाढते

शेंगदाण्यामध्ये उच्च कॅलरी असतात, ज्या आपल्या शरीराचे वजन वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपण वजन कमी करण्याचा विचार करत असल्यास शेंगदाणे खाणे नक्कीच टाळा.

हृदय समस्या

शेंगदाण्यामध्ये उच्च संतृप्त चरबी असते, जी हृदय विकराचा झटका, स्ट्रोक, आच्छादित रक्तवाहिन्या इत्यादीसारख्या हृदयाशी संबंधित आजारांना चालना देण्याचे कार्य करते. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला पाचन समस्या, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Peanuts side effects on health)

हेही वाचा :