प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य एखाद्या सेलिब्रेटी सारखं किंवा आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीसारखं असावं. कित्येक लोक तर त्यांच्या आवडत्या व्यक्तीला किंवा सेलिब्रेटीला फॉल करून त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करत असतात. तर यामध्ये तुम्ही एमएस धोनीचे फॅन असाल तर तुम्हालाही धोनीसारखी पर्सनॅलिटी करायची असेल किंवा त्याच्यासारखं बनायचं असेल तर त्याच्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील.
एमएस धोनी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद एकदम मनसोक्त घेत असतो. तो त्याचे भविष्य आणखी चांगले होण्यासाठी आजही काम करतोय. धोनीचे हे तत्व प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. कारण तुम्हालाही तुमचे भविष्य सुधरवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.
धोनी त्याच्या प्रत्येक खेळीत तो नेहमी त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या याच कौशल्य आणि मेहनतीने देशाला विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनी केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर एक खेळाडू म्हणूनही त्याने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपणही धोनीसारखं सर्वोत्तम द्यायला हवे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या करिअर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच होईल.
धोनी हा असा व्यक्ती आणि खेळाडू आहे जो नेहमी स्वतःच्यातील कमतरता ओळखण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात ना माणूस चुकांमधून शिकतो, अगदी तसंच आपणही कुठे चुकतो किंवा आपल्यात काय कमतरता आहे ते ओळखले पाहिजे.
धोनीनेही त्याच्या आयुष्यात संघर्ष केला आहे. त्यानेही अनेक संकटांचा, अडचणींचा सामना केला आहे. पण यावेळी तो खचला नाही किंवा Give up केलं नाही. तो नेहमी काहीना काही पुढे जात राहीला. त्यामुळे आज तो एवढा यशस्वी आहे. त्यामुळे तुम्हीही धोनीची ही सवय नक्कीच अंगिकारा. त्यामुळे तुमच्याही आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.