मुंबई : बर्याच वेळा आपण बाजारातून महाग परफ्यूम आणि डीओ खरेदी करतात. परंतु, तरीही त्यांची सुगंध फार काळ टिकत नाही. आपल्यालाही अशीच समस्या उद्भवल्यास आपण पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. होय, पेट्रोलियम जेलीच्या मदतीने आपण परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकवून ठेवू शकता. यासाठी परफ्यूम किंवा डीईओ लावण्यापूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी ‘पेट्रोलियम जेली’ लावावी लागेल. पेट्रोलियम जेलीचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया…(Petroleum jelly perfume fragrance)
– पेट्रोलियम जेली हायड्रोकार्बन, खनिज तेल आणि मेण यांचे मिश्रण आहे. हिवाळ्यात रात्री झोपताना त्वचेवर आणि ओठांवर ते लावले, तर ते उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते. त्याचबरोबर, त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
– चेहरा आणि डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यासाठीही पेट्रोलियम जेली खूप फायदेशीर आहे. हे उत्तम क्लीन्सर म्हणून काम करते.
– कोणत्याही बॅग, जीन्स किंवा पॅन्टची चेन खराब झाल्यास आपण त्यावर पेट्रोलियम जेली लावून तिला दुरुस्त करू शकता. यासाठी खराब चेनवर पेट्रोलियम जेली लावून, दोन ते तीन वेळा उघड बंद करा. यामुळे साखळी ठीक होईल.
– शू पॉलिश पूर्ण झाल्यावर आपण ते शू पॉलिश म्हणून वापरू शकता, याने शूजचा रंग खराब होत नाही. यासाठी शूजवर थोडे पेट्रोलियम जेली लावा आणि स्वच्छ कपड्याने चोळा, शूज चमकू लागतील (Petroleum jelly perfume fragrance).
– हिवाळा सुरू झाला की पायाच्या टाचा कोरड्या पडतात आणि त्वचेवर भेगा पडू लागतात, अशावेळी पेट्रोलियम जेली वापरू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांवर पेट्रोलियम जेलीची मालिश करा. काही दिवसात त्याचा फायदा दिसून येईल.
– आपण केसांमध्ये मेंदी किंवा रंग लावत असाल तर आपल्या कपाळ, मान आणि कानावर पेट्रोलियम जेली लावा. यामुळे कपाळ, मान आणि कानांवर मेहंदी लागून डाग लागणार नाही.
– याशिवाय मुलांच्या केसात उवा झाल्या असतील तर आपण पेट्रोलियम वापरू जेली वापरू शकता. यासाठी केसांच्या टाळूवर पेट्रोलियम जेली लावा. थोड्या वेळाने, केस एखाद्या शॅम्पूने चांगले धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने केसांतील उवा कमी होईल.
– चेहर्याची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आपण स्क्रब म्हणून पेट्रोलियम जेली देखील वापरू शकता. यासाठी साखरेच्या काही दाण्यांमध्ये पेट्रोलियम जेली मिसळा आणि ते आपल्या चेहर्यावर लावा आणि हलके हाताने स्क्रब करा.
(Petroleum jelly perfume fragrance)
Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायीhttps://t.co/8dxO991ygi#Typhoid #Fever #HealthyFood
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020